• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • सर्व PAN, Aadhaar कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! हे काम त्वरित पूर्ण करा, नाहीतर होईल मोठं नुकसान

सर्व PAN, Aadhaar कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! हे काम त्वरित पूर्ण करा, नाहीतर होईल मोठं नुकसान

प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्यापासून ते मोठ्या बँकिंग व्यवहारांसाठी पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. याशिवाय इतर अनेक आर्थिक कामांसाठी (Financial Transactions) पॅन कार्ड असणं बंधनकारक आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: आपल्या देशात आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) ही सर्वांत महत्त्वाची कागदपत्रं आहेत. सरकारी मान्यता असलेली ही कागदपत्रं ओळखीचा (Identity Proof) अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातात. प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्यापासून ते मोठ्या बँकिंग व्यवहारांसाठी पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. याशिवाय इतर अनेक आर्थिक कामांसाठी (Financial Transactions) पॅन कार्ड असणं बंधनकारक आहे. त्याच वेळी, आधार कार्डचा वापर ओळख दर्शविण्यासाठी केला जातो. प्रत्येक नागरिकाकडे ही दोन कागदपत्रं असणं महत्त्वाचं आहे. ही कागदपत्रं नसल्यास अनेक कामांत अडथळे येतात. सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासह अनेक सरकारी कामांमध्ये याची गरज असतेच. प्राप्तिकर विभागाने पॅन कार्ड (Pan Card and Aadhar Card Linking) आधारशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. तसंच 31 मार्च 2022 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न करणाऱ्या नागरिकांचं पॅन कार्ड 1 एप्रिल 2022 पासून निष्क्रिय होईल. त्यामुळे तुमचं आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केलेलं नसेल तर ते तत्काळ करून घ्या. यासाठीची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, ती घरबसल्या ऑनलाइनदेखील करता येते. खालील टप्प्यांत ही प्रक्रिया करता येते. हेही वाचा-  Realme ग्राहकांसाठी खुशखबर! 'हा' फोन त्वरित खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट
 आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्याकरिता :
- सर्वप्रथम प्राप्तिकर कर विभाग अर्थात इन्कम टॅक्स विभागाच्या (Income Tax Department) वेबसाइटवर जा. - आधार कार्डमध्ये दिल्याप्रमाणे नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाका. - आधार कार्डमध्ये फक्त जन्माचं वर्ष दिलं असल्यास चौकोनावर टिक करा. - आता कॅप्चा कोड टाका. - आता 'लिंक आधार' या बटणावर क्लिक करा - त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक केलं जाईल.
याशिवाय एसएमएसद्वारेदेखील (SMS) तुम्ही हे काम करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाइप करावे लागेल. यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक टाका. आता हा संदेश 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. हेही वाचा- Correction in PAN Card: PAN Card वर फोटो आणि Signature करता येणार चेंज; वाचा संपूर्ण प्रोसेस
 तुमचं पॅन कार्ड काही कारणाने निष्क्रिय (Deactivate) झालं असेल तर ते पुन्हा सुरू करता येते. यासाठी तुम्हाला एक एसएमएस पाठवावा लागेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवरून मेसेज पाठवण्यासाठी मेसेजमध्ये आधी 12 अंकी पॅन क्रमांक टाका. त्यानंतर स्पेस देऊन 10 अंकी आधार क्रमांक टाका. हा एसएमएस 567678 किंवा 56161या क्रमांकावर पाठवा. तुमचं पॅन कार्ड पुन्हा कार्यरत (Activate) होईल.
Published by:Pooja Vichare
First published: