Home /News /technology /

PhonePe युजर्संना झटका! आता अशाप्रकारे पैसे अ‍ॅड करणे झाले महाग

PhonePe युजर्संना झटका! आता अशाप्रकारे पैसे अ‍ॅड करणे झाले महाग

PhonePe

PhonePe

अनेक युजर्स क्रेडिट कार्डवरून (Credit Card)फोनपे वॉलेटमध्ये पैसे टाकून छोटे -मोठे व्यवहार करतात. आता फोनपे वॉलेट युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे.

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही किराणा दुकानातून माल खरेदी करण्यासाठी फोनपे वॉलेट (PhonePe Wallet) वापरता. अनेक युजर्स क्रेडिट कार्डवरून (Credit Card)फोनपे वॉलेटमध्ये पैसे टाकून छोटे -मोठे व्यवहार करतात. आता फोनपे वॉलेट युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. दरम्यान, आता फोनपे (PhonePe) वापरणे महाग झाले आहे. फोनपे कंपनीने आता युजर्सकडून मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge) केल्यानंतर 1 ते 2 रुपयांचे शुल्क (Platform Fee) आकारण्यास सुरुवात केली आहे. या फीला कंपनीने फोन पे प्लॅटफॉर्म वापरल्याची प्लॅटफॉर्म फी म्हटलं आहे. यात विशेष म्हणजे, हे अतिरिक्त शुल्क कोणत्याही पेमेंट मोडच्या (UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि फोनपे वॉलेट) माध्यमातून रिचार्ज केल्यावरही आकारले जात आहे.

शुल्क आकारणे हा एक छोटा प्रयोग

कंपनीकडून एक प्रयोग करण्यात येत असून जे युजर्स या प्रयोगाचा भाग आहेत त्यांच्याकडून 50 ते 100 रुपयांच्या व्यवहारासाठी 1 रुपया आणि 100 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारासाठी 2 रुपये शुल्क आकारले जात आहे. ही माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे. फोनपेवर सक्रिय असणाऱ्याच बहुतांश युजर्सकडून 1 रुपया शुल्क आकारण्यात येत आहे.

PhonePe वर मिळवू शकता विमा कंपन्यांचे प्रोडक्ट्स

जीवन विमा आणि सामान्य विमा उत्पादने विकण्यासाठी आयआरडीएकडून (IRDA)तत्त्वतः मान्यता मिळाली आहे, असे अलीकडेच फोनपे (PhonePe) कंपनीने म्हटले होते. तसेच, कंपनी आता आपल्या 30 कोटीहून अधिक युजर्संना विमा संबंधित सल्ला देऊ शकते, असे म्हटले होते. दरम्यान, आयआरडीएने फोनपे कंपनीला विमा ब्रोकिंग परवाना दिला आहे. आता फोनपे भारतातील सर्व विमा कंपन्यांची विमा उत्पादने विकू शकते. फ्लॅटफॉर्म फी अशी फी इतर कुठलाही प्लॅटफॉर्म ग्राहकांकडून घेत नाही. फ्री चार्ज, गुगल पे, पेटीएम, भीम असे अनेक प्लॅटफॉर्म्स डिजिटल पेमेंट सेवा देतात. या सर्व फ्लॅटफॉर्मकडून अशी फी घेतली जात नाही. फोन पे ने प्रयोग म्हणून अशी फी आकारायला सुरुवात केली आहे. ती प्रत्यक्षात लागू झाली तर ग्राहकांना भुर्दंड बसेल.
First published:

Tags: Online payments, Upi

पुढील बातम्या