Home /News /technology /

PhonePe चं नवं रेंट पेमेंट फीचर; क्रेडिट कार्डने देता येणार घरभाडं

PhonePe चं नवं रेंट पेमेंट फीचर; क्रेडिट कार्डने देता येणार घरभाडं

देशातील डिजीटल पेमेंट कंपनी PhonePe नेदेखील भाडं भरण्याची सुविधा सुरू केली आहे. फोनपेच्या माध्यमातून तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा यूपीआयद्वारे घरभाडं भरू शकता.

  नवी दिल्ली, 12 जुलै : सर्वसाधारणपणे लोक क्रेडिट कार्डने शॉपिंग, रिचार्ज, बिल पेमेंट, रेल्वे-फ्लाईट तिकीट बुकिंग, ऑनलाईन पेमेंट करतात. पण क्रेडिट कार्डने घरभाडंही भरता येतं. अनेकदा क्रेडिट कार्डने भाडं भरणं शक्य नाही, कारण घर मालक पेमेंट गेटवेचा वापर करत नाही. परंतु आता पेटीएम, फ्रीचार्ज, क्रेड, नो ब्रोकर, रेड जिराफ सारख्या अनेक मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे घरभाडं क्रेडिट कार्डने देता येऊ शकतं. आता देशातील डिजीटल पेमेंट कंपनी PhonePe नेदेखील भाडं भरण्याची सुविधा सुरू केली आहे. फोनपेच्या माध्यमातून तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा यूपीआयद्वारे घरभाडं भरू शकता. PhonePe App द्वारे क्रेडिट कार्डने भाडं भरताना 1.3 टक्के एक्स्ट्रा चार्जही द्यावा लागतो. परंतु कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉईंट्सदेखील मिळतात. जर 10 हजार रुपये घरभाडं द्यायचं असेल, तर तुम्हाला 10,130 रुपयांचं पेमेंट करावं लागेल. PhonePe App ने असं करा घरभाड्याचं पेमेंट - - सर्वात आधी PhonePe अपडेट करा. - आता All Service वर क्लिक करा. - त्यानंतर Recharge & Pay Bills सेक्शनमध्ये Rent Paytment चा पर्याय दिसेल. - Rent Paytment वर क्लिक केल्यानंतर घरभाड्याची रक्कम आणि घरमालकांचे बँक अकाउंट डिटेल्स टाका. - पेमेंट मोड सिलेक्ट करा. त्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे पेमेंट करा.

  (वाचा - तुमच्या कामाची बातमी! YouTube वर व्हिडीओ पाहताना अशा ब्लॉक करा जाहिराती)

  क्रेडिट कार्डने घरभाडं भरण्याचे फायदे - - क्रेडिट लिमिटचा वापर करुन कॅश वाचवू शकता. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट 40-45 दिवसांनंतर होतं, अशाप्रकारे भाड्याचे पैसे इतर ठिकाणी गुंतवू शकता. - क्रेडिट कार्डने केलेलं ट्रान्झेक्शन EMI मध्ये कन्वर्ट करू शकता. - क्रेडिट कार्डने केलेल्या ट्रान्झेक्शनवर कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉईंट्सदेखील मिळतात.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Credit card, Tech news

  पुढील बातम्या