मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फोनची मजा आता Smartwatch मध्ये; 36 तासांची बॅटरी लाइफ आणि अनेक खासियत, जाणून घ्या किंमत

फोनची मजा आता Smartwatch मध्ये; 36 तासांची बॅटरी लाइफ आणि अनेक खासियत, जाणून घ्या किंमत

 हे स्मार्टवॉच सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य स्मार्टवॉचेसच्या तुलनेत थोडं वेगळे आहे. कारण हे स्मार्टवॉच e-simला सपोर्ट करते.

हे स्मार्टवॉच सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य स्मार्टवॉचेसच्या तुलनेत थोडं वेगळे आहे. कारण हे स्मार्टवॉच e-simला सपोर्ट करते.

हे स्मार्टवॉच सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य स्मार्टवॉचेसच्या तुलनेत थोडं वेगळे आहे. कारण हे स्मार्टवॉच e-simला सपोर्ट करते.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 6 जून : सध्या बाजारात तसेच ई-कॉमर्स (E-Commerce) पोर्टलवर वैविध्यपूर्ण फिचर्स असलेली अनेक कंपन्याची स्मार्टवॉचेस (Smartwatches) ग्राहकांकरिता उपलब्ध आहे. अत्याधुनिक फिचर्स आणि तंत्रज्ञानानेयुक्त अशी स्मार्टवॉचेस ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यातच  चायनीज स्मार्टफोन कंपनी मेईजूने (Meizu) एक नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. हे स्मार्टवॉच सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य स्मार्टवॉचेसच्या तुलनेत थोडं वेगळे आहे. कारण हे स्मार्टवॉच e-simला सपोर्ट करते. ई-सिम सपोर्ट असणाऱ्या या स्मार्टवॉचवरुन तुम्ही कॉलिंग (Calling) आणि मेसेजिंग (Messeaging) करु शकता, तसेच स्मार्टफोनमधील काही फिचर्सही या स्मार्टवॉचमध्ये वापरता येतात. वैविध्यपूर्ण फिचर्स असल्यानं हे स्मार्टवॉच युवकांमध्ये खूप लोकप्रिय होऊ शकतं. जाणून घेऊया या स्मार्टवॉचे फिचर्स आणि किमतीविषयी...

हे ही वाचा-'या' कंपनीच्या स्मार्ट टीव्ही खरेदीवर मिळतेय 4500 रुपयांची सूट

वैशिष्ट्य

मेईजूने या स्मार्टवॉचमध्ये 1.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचे स्क्रिन रेझोल्युशन 368*448 पिक्सल आहे. हा डिस्प्ले 2.5Dकॉर्निंग गोरीला ग्लासने प्रोटेक्ट केलेला आहे. हे स्मार्टवॉच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4100 WEAR या प्रोसेसर वर चालते. कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये 420mAh ची बॅटरी दिलेली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 36 तास बॅकअप देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. केवळ 15 मिनिटं बॅटरी चार्ज करुन युजर्स संपूर्ण दिवस हे स्मार्टवॉच वापरु शकतात. कंपनीने हे स्मार्टवॉच Flyme OSवर विकसित केलं आहे. युजर स्मार्टवॉच स्ट्रेपपासून वेगळे करुन कोणत्याही c-type पोर्टच्या चार्जने चार्ज करु शकतात.

स्मार्टवॉचची फिचर्स कशी आहेत?

कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या स्मार्टवॉचेसच्या तुलनेत अनेक फिचर्स दिले आहेत. युजर या स्मार्टवॉचच्या मदतीने ब्लड ऑक्सिजन मॉनिटर करु शकतो. तसेच ब्रिदींग ट्रेनिंग देखील करु शकतो. या व्यतिरिक्त युजर या स्मार्टवॉच च्या मदतीने स्लीप, ब्लड प्रेशर, हार्टरेट आणि फिटनेस देखील ट्रॅकिंग करु शकतो. कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये अनेक प्रकारचे फेस (Face) दिलेले आहेत, तसेच युजर त्याच्या आवडीचाही फेस तयार करु शकतो.

किंमत काय आहे?

कंपनीने सध्या हे स्मार्टवॉच केवळ चीनमध्येच (China) लॉन्च केले आहे. परंतु, लवकरच जागतिक बाजारासह भारतीय बाजारातही याचे लॉन्चिंग होणार आहे. चीनमध्ये या स्मार्टवॉचची किंमत सुमारे 1499 युआन म्हणजेच भारतीय रुपयानुसार 17,117 रुपये ठेवली आहे. कंपनीने ब्लॅक आणि निळ्या अशा 2 कलर्समध्ये हे स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. भारतात या स्मार्टवॉचची स्पर्धा अॅपल, सॅमसंग आणि हुओई सारख्या कंपन्यांच्या स्मार्टवॉचेसशी होणार आहे.

First published:

Tags: Smartwatch, Technology