धक्कादायक! फोनची बॅटरी ठरवते तुमचा मूड, हे वाचलंत का?

धक्कादायक! फोनची बॅटरी ठरवते तुमचा मूड, हे वाचलंत का?

आपण मोबाईल वापरतो की मोबाईल आपल्याला वापरतो हेच कळत नाही. आता एका संशोधनातून मोबाईलचं चार्जिंग तुमचा मूड कसा असेल हे ठरत असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

लंडन, 19 सप्टेंबर : तुमच्या फोनची बॅटरीमुळं तुमचा मूड कसा राहणार हे ठरतं असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हिंदुस्तान वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार लंडन युनिव्हर्सिटीचे मार्केटिंग संशोधक थॉमस रॉबिन्सन आणि फिनलँडच्या अल्टो युनिव्हर्सिटीच्या शोधाची माहिती समोर आली आहे.

संशोधनानुसार, ज्यांच्या फोनची बॅटरी फुल्ल चार्ज असते ते लोक सकारात्मक असतात. त्यांना वाटतं की आता आपण कुठेही जाऊ शकतो. संशोधकांनी यासाठी लंडनमधील 23 ते 57 वर्षांच्या लोकांचे संशोधन केले. जे रोज कुठे ना कुठे एक ते तीन तास प्रवास करतात. अशा परिस्थितीत किती लांब जायचं याची तुलना लोक बॅटरी चार्जिंगशी करतात. त्यांच्या डोक्यात हेच चालू असतं की बॅटरी किती काळ टिकेल. तर याच्या विरुद्ध नकारात्मकता कमी बॅटरी असलेल्या लोकांमध्ये असते.

लोकांना विचारण्यात आलं की दिवस संपताना बॅटरी किती आहे हे पाहून काय वाटतं? यावर लोकांनी बॅटरी फुल्ल असलेलं पाहायला आवडतं. ज्यावेळी बॅटरी अर्धी असते तेव्हा काळजी वाटते तर ती 30 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर काळजी आणखी वाढते.

संशोधनातून समोर आलेल्या बाबी धक्कादायक अशाच आहेत. लोकांना बॅटरी फुल्ल असेल तेव्हा सकारात्मक वाटतं. जितकी बॅटरी चार्ज असेल तितका वेळ ते काम उत्साहानं करतात. तर ज्यांची बॅटरी कमी असते ते अस्थिर असतात. त्यांच्या आयुष्यात त्याचा नकारात्मक परिणाम होत असतो.

VIDEO: मंत्र्यांची भेट न झाल्यानं शिक्षकांनी उचललं टोकाचं पाऊल, मंत्रालयावरून मारली उडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mobile
First Published: Sep 19, 2019 09:49 AM IST

ताज्या बातम्या