Home /News /technology /

1 एप्रिलपासून मिळणार BSVI पेट्रोल, डिझेल...जाणून घ्या BSVI पेट्रोल तुमच्या गाडीत टाकल्यावर काय होणार?

1 एप्रिलपासून मिळणार BSVI पेट्रोल, डिझेल...जाणून घ्या BSVI पेट्रोल तुमच्या गाडीत टाकल्यावर काय होणार?

1 एप्रिल 2020 पासून BS6 एमिशन स्टेंडर्ड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रामुख्याने तेल उत्पादन कंपन्यांनी देखिल बीएस6 करता रिफाइनरीजना अपडेट करण्याच्या तयारीत आहेत.

    मुंबई, 03 मार्च:देशात वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2020 पासून BS6 एमिशन स्टेंडर्ड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रामुख्याने तेल उत्पादन कंपन्यांनी देखिल बीएस6 करता रिफाइनरीजना अपडेट करण्याच्या तयारीत आहेत. साधारणपणे ज्या इंधनामध्ये सल्फरचं प्रमाण कमी असेल ते इंधन अधिक साफ आणि कमी प्रदूषण करणारे असते. सल्फर कमी असल्यामुळे उत्सर्जित होणार NOx आणि कार्बन मोनाऑक्साईड CO आणि हाइड्रोकार्बनचं प्रमाण देखील कमी होईल. CNG गाड्यांवर BS6 चा काय परिणाम होणार? बीएस6 इंधनावर चालणाऱ्या डिझेल, पेट्रोल इंजिनाच्या कार तयार करताना थोडा बदल करण्यात येणार आहे. नव्या गाड्यांना सुरूवातीला CNG च्या आधारावरच तयार करण्यात येणार आहे. अनेक मोठ्या कंपन्या आता इलेक्ट्रिक आणि हाइब्रिड गाड्यांवर अधिक भर लक्ष देण्यात आलं आहे. BS6 इंधन महागणार? इंधन बनवणाऱ्या तेल रिफायनरी कंपन्यांना आपली रिफायनरी अपग्रेड करावी लागली. या अपग्रेडेशनवर होणार खर्च सामान्य ग्राहकांकडून वसून करण्यात येणार आहे. यासंबंधीत काही प्रमुख कंपन्यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे इंधनांच्या किंमतीत फार कमी वाढ होणार आहे. तुम्ही जुन्या कारला BS6 मध्ये कन्व्हर्ट करू शकता का? जुन्या वाहनाला तुम्ही बीएस6 इंजिनाच्या स्टॅर्डमध्ये कन्व्हर्ट करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त खर्च येणार आहे. भारतामध्ये असे करणे अवैध आहे. BS5ला BS6 स्टॅंर्डमध्ये लागू केलं जाणार? भारतात पहिल्यांदा 2000 मध्ये एमिशन स्टॅंडर्ड लागू करण्यात आलं. बीएस2 2005 मध्ये तर बीएस6 2010मध्ये लागू करण्यात आला. बीएस4 ला 2017 मध्ये लागू करण्यात आलं. यानंतर वाढतं प्रदुषण पाहता आता बीएस6 लागू करण्यात येणार आहेत. BS4 वाहनांना सर्टिफिकेट देणं आवश्यक? रस्त्यावर धावणाऱ्या बीएस4 इंजिन असलेल्या वाहनांना प्रदुषण अंडर कंट्रोल सर्टिफिकेटची आवश्यक असणार आहे. यासंबंधित तसा कायदा करण्यात आला आहे. 2020 नंतर BS4 वाहनांचं काय होणार? 1 एप्रिल 2020 नंतर बीएस4 वाहनांची निर्मिती आणि नोंदणी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. मात्र जुनी वाहनं चालवण्याची पूर्ण परवागी असणार आहे. कारच्या परफॉर्मसवर काय परिणाम होणार? BS6 वाहनांमध्ये बीएस4 ची तुलना करण्यात येते आहे. या गाड्यांचं नॉर्मल स्पीडनेचं अंतर पार करू शकणार आहे. वाहनांच्या माइलेजवर काय परिणाम होणार? दोन इंजिनाची तुलना केल्यास दोघांमध्ये फार कमी फरक असणार आहे. बीएस6 इंजिनाचं टेस्टींग करण्यात आलं यामध्ये Mauti Dzire चं माइलेज 21.21 किलोमीटर प्रति लीटर असणार आहे. बीएस4 इंजिनासोबत 22 किलोमीटर प्रति लीटर होतं. या दोन्ही इंजिनच्या माइलेजमध्ये फारसा फरक नाही आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Petro price, Petrol and diesel

    पुढील बातम्या