सावधान! ऑक्सिजन आणि औषधांच्या नावे Payment App आणि WhatsApp द्वारे होतेय फसवणूक

सावधान! ऑक्सिजन आणि औषधांच्या नावे Payment App आणि WhatsApp द्वारे होतेय फसवणूक

अनेकांना या सोशल प्लॅटफॉर्म्समुळे मोठी मदतही होत आहे. परंतु काही सायबर चोरांकडून मात्र याचा चुकीचा फायदा घेतला जात असून सर्वसामान्यांची मोठी फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मे : ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा युजर्स कोरोना काळात हॉस्पिटल्स बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर आणि कोरोनाच्या इतर माहितीसाठी वापर करत आहेत. अनेकांना या प्लॅटफॉर्म्समुळे मोठी मदतही होत आहे. परंतु काही सायबर चोरांकडून मात्र याचा चुकीचा फायदा घेतला जात असून सर्वसामान्यांची मोठी फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे.

जर तुम्ही या प्लॅटफॉर्म्सवर कोरोना काळात मदत किंवा ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अनेक बनावट, फेक डॉक्टर्सही सामान्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने काम करत आहेत. अशावेळी ते अ‍ॅडव्हान्स म्हणून एक मोठी रक्कम मागू शकतात आणि मदत करणार असल्याचं सांगतात. युजर्सही मदत मिळवण्यासाठी व्हॉट्सअप पे, गुगल पे आणि पेटीएमवरुन पैसे ट्रान्सफर करतात. परंतु जसं या बनावट डॉक्टर्स किंवा संबंधित व्यक्तीला पैसे ट्रान्सफर होतात, तसं ते युजरला ब्लॉक करतात. त्यानंतर ना त्यांचा फोन लागतो, ना त्यांना कोणताही मेसेज जात.

नुकतंच काही रिपोर्ट्समध्ये याबाबत खुलासे करण्यात आले आहेत. काही युजर्स ऑक्सिजन सिलेंडरसाठी घाई-गडबडीत अशा फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे कोरोना काळात सोशल मीडियावरुन मदत घेणं फायदेशीर ठरत असलं, तरी त्याची चौकशी करुनच पुढील पावलं उचलावीत.

(वाचा - तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी Google अकाऊंटमधून काढून टाका हे अ‍ॅप, अन्यथा...)

(वाचा - Coronavirus: पल्स Oximeter खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाच)

स्कॅमर्सपासून कसं वाचाल?

- सर्वात आधी कुठून मदतीची लीड मिळाली आहे ती योग्य आहे की नाही याची शहानिशा करा. स्कॅमर्स अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर ब्लॉक करतात.

- कॉल करुन कोणीही वेरिफाय होत नाही, त्यामुळे नेहमी त्या व्यक्तीबाबत चौकशी करा.

- ट्विटरवर फ्रॉड अलर्टबाबत माहिती घेत राहा आणि इतरांकडेही चौकशी करा.

- कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी, सोशल मीडियावरुन कोणतीही मदत घेण्यापूर्वी अथॉरिटी सोर्सेस चेक करा. हेल्थ मिनिस्ट्री वेबसाईटवर जावून अधिक माहिती घ्या.

Published by: Karishma Bhurke
First published: May 3, 2021, 7:49 PM IST

ताज्या बातम्या