Home /News /technology /

ना पेट्रोल ना डिझेल.. माणसाच्या लघवीवर चालणार ट्रॅक्टर! जगातील पहिलाच प्रयोग

ना पेट्रोल ना डिझेल.. माणसाच्या लघवीवर चालणार ट्रॅक्टर! जगातील पहिलाच प्रयोग

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सगळेच चिंतेत आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये त्यांच्या पर्यायांवर काम सुरू आहे. आता अशाच एका पर्यायी इंधनावर काम सुरू आहे.

    मुंबई, 29 जुलै : पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ हा कायमचाच ज्वलंत विषय आहे. पूर्वीच्या काळी त्यांचे दर कमी होते; पण नंतरच्या प्रगतीच्या काळात इंधनाचा वापर झपाट्याने प्रचंड वाढला आणि त्या तुलनेने पुरवठ्यात मात्र वाढ झाली नाही. त्याशिवाय इतरही अनेक आंतरराष्ट्रीय कारणांमुळे पेट्रोल-डिझेलची दरवाढ अलीकडे कायमच होत असते. इंधनाची दरवाढ (Fuel from Human Urine) म्हणजे सगळ्या महागाईचं कारण होतं. पर्यायी इंधन म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय उपलब्ध झाला आहे; मात्र त्यावर अजून बरंच संशोधन होण्याची आवश्यकता आहे. इंधनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यात बायो-इथेनॉल मिसळण्यासारखे प्रयोगही सुरू आहेत; पण तरीही इंधनाला अत्यंत सक्षम असा चांगला पर्याय शोधण्याचे प्रयोग जगभर सातत्याने सुरू आहेत. त्यातलाच एक प्रयोग म्हणजे (Human Urine) मानवी मूत्राचा. होय! हे खरं आहे. मानवी मूत्रावर वाहनं चालू शकतील का, हे आजमावण्याचे प्रयोग अमेरिका आणि भारतासह जगात अनेक ठिकाणी सुरू आहेत. अमोगी या अमेरिकी कंपनीने (US Company) अमोनियावर चालणारा ट्रॅक्टर तयार केला आहे. मानवी मूत्रात अमोनिया मोठ्या प्रमाणावर असतो; त्यामुळे मानवी मूत्राचा इंधन म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो. अर्थात, अद्याप यावर संशोधन सुरू असून, पूर्ण तंत्रज्ञान विकसित व्हायला आणखी काही काळ जाऊ शकतो. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. लॉकडाउनचा असाही उपयोग! पठ्ठ्यानं घरीच तयार केलं विमान; चार देशही आला फिरून अमोनिया हे काही नवं संयुग नव्हे. उद्योगांमध्ये त्याचा वापर बऱ्याच काळापासून होत आला आहे. अमोनियाची साठवणूक, हाताळणी, डिलिव्हरी आदींची साधनं/व्यवस्था आधीपासूनच अस्तित्वात आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमोनियाच्या प्रक्रियेतून कार्बन डाय ऑक्साइडचं (Carbon Di Oxide) उत्सर्जन होत नाही आणि ऊर्जानिर्मितीही मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे प्रदूषणविरहित इंधनाचा स्रोत म्हणून अमोनिया हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अमेरिकेतल्या अमोगी या कंपनीने असा एक रिअ‍ॅक्टर तयार केला आहे, की जो अमोनियाचं (Amonia) विघटन करतो आणि त्यातल्या हायड्रोजनचा वापर करून त्यापासून ऊर्जानिर्मिती करतो. याचाच अर्थ असा, की पेट्रोलऐवजी गाडीच्या टाकीत मानवी मूत्र टाकलं की गाडी चालेल अशी कल्पना डोक्यात आली असेल, तर काढून टाका. इंधन म्हणून मूत्राचा वापर होण्यासाठी आधी त्यावर प्रक्रिया व्हावी लागेल. DW ने दिलेल्या रिपोर्टनुसार, मानवी मूत्रापासून अमोनियाची निर्मिती करून त्यापासून ऊर्जानिर्मिती शक्य आहे. सध्या तरी अमोगी या कंपनीने हा प्रयोग केवळ ट्रॅक्टरवर केला आहे; मात्र भविष्यात या इंधनापासून मालवाहतूक करणारी जहाजं चालवता यावीत, या दृष्टीने संशोधन सुरू आहे. आणखी एक बाब म्हणजे मानवी मूत्राची अशी विल्हेवाट लावता येणार असेल, तर त्यातून स्वच्छतेच्या अनुषंगानेही बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतील.
    First published:

    Tags: Petrol and diesel price

    पुढील बातम्या