Home /News /technology /

आता FASTag द्वारेच मिळणार पार्किंग सुविधा, Paytm ची नवी सर्विस; पाहा कसा होणार फायदा

आता FASTag द्वारेच मिळणार पार्किंग सुविधा, Paytm ची नवी सर्विस; पाहा कसा होणार फायदा

Paytm पेमेंट्स बैंक लिमिटेडने देशातील पहिली FASTag बेस्ड मेट्रो पार्किंग सुविधा सुरू केली आहे.

  नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : डिजीटल सर्विस देणारी कंपनी Paytm देशभरात FASTag बेस्ड पार्किंग सर्विसेज सुरू करणार आहे. Paytm पेमेंट्स बैंक लिमिटेडने (Paytm Payments Bank Ltd- PPBL) याची माहिती देत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसह (DMRC) करार करत देशातील पहिली FASTag बेस्ड मेट्रो पार्किंग सुविधा सुरू केली आहे. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने (PPBL) ते फास्टॅगद्वारे पार्किंग शुल्क जमा करणार असल्याचं सांगितलं. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या ग्राहकांना सुविधा देण्याच्या प्रयत्नांच्या दिशेने हे एक पाउल आहे. विशेषत: अशा वेळी जेव्हा संपर्करहित व्यवहारांची गरज आहे. पेटीएमने कश्मीरी गेट मेट्रो स्टेशनवर FASTag आधारित पार्किंग सुविधा सुरू केली आहे. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने (PPBL) वॅलिड FASTag स्टिकर कार्ससाठी सर्व फास्टॅग आधारित व्यवहारांची प्रोसेसिंग सुविधा दिली जाईल. यामुळे काउंटरवर कॅश पेमेंट करण्यासाठी थांबण्याची गरज भासणार नाही. त्याशिवाय पेटीएम पेमेंट्स बँकने पार्किंग साइटमध्ये एन्ट्री करणाऱ्या टू-व्हिलर वाहनांसाठी एक यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सोल्युशन सुरू करण्यात आलं आहे. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड शॉपिंग मॉल, रुग्णालयं आणि विमानतळांवर पार्किंगसाठी डिजीटल पेमेंट लागू करण्यासाठी चर्चा सुरू आहे.

  तुमच्या गाडीच्या Number Plate बाबतचं हे काम झालं का? नसेल तर वाढू शकतात अडचणी

  FASTag हे इलेक्ट्रॉनिक टोल संकलन तंत्र आहे. हा एक रेडिओ फ्रीक्वेंसी टॅग आहे, जो गाडीच्या पुढच्या काचेवर लावला जातो. टोल प्लाजावरून जाताना तेथे लावलेला सेन्सर हा टॅग रीड करेल. त्यानंतर फास्टॅगशी जोडलेल्या खात्यातून पैसे कट होतील.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Paytm

  पुढील बातम्या