नवी दिल्ली, 17 जून : पेमेंट अॅप पेटीएमद्वारे (Paytm) आता केवळ डिजीटल पेमेंटच (Digital payment) नाही, तर बाईक आणि कारचा इन्शोरन्सही करता येणार आहे. पेटीएम इन्शोरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड (PIBPL) पेटीएमच्या पूर्ण स्वामित्व असणाऱ्या कंपनीने कार आणि बाईक विमा लाँच केला आहे. कंपनीने परवडणाऱ्या वाहन विमा प्लॅनसाठी 14 टॉप इन्शोरन्स कंपन्यांसह भागीदारी केली आहे.
पेटीएम प्लॅटफॉर्मवर पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी वाहन मालकांना कोणतीही कागदपत्र अपलोड करावी करण्याची आवश्यकता नाही. या विमा उत्पादनांसाठी पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड, पेटीएम यूपीआय, नेट बँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पैसे दिले जाऊ शकतात.
PIBPL पूर्णपणे डिजीटल प्रक्रियेत केवळ थर्ड पार्टी आणि ऑन डॅमेज ओनली पॉलिसी खरेदी करण्याचा पर्याय देतं. त्याशिवाय कंपनी कारशिवाय 14 अॅड-ऑन ऑप्शन आणि दुचाकी वाहनांसाठी 6 अॅड-ऑन ऑप्शन देते, ज्यात चालान कव्हर, रोड साईड अॅक्सिडेंट आणि इंजिन सेफ्टी सामिल आहे.
कंपनी आपल्या ग्राहकांना एक क्लेम सपोर्ट आणि पोस्ट पॉलिसी पर्चेज सर्विस देईल. यासाठी एक वेगळी सर्विस टीम असेल. मोटर इन्शोरन्स प्रोडक्ट पेटीएम अॅप, पेटीएम वेबसाईट आणि मोबाईल वेबसाईटसह www.paytminsurance.co.in वरही उपलब्ध आहे.
पेटीएम इन्शोरन्स ब्रोकिंग लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, की विमा भारतात एक अंडरसर्व्ड सेगमेंट आहे. अॅक्सेसिबिलिटी आणि अफोर्डबिलिटीला प्राथमिकता देऊन हे बदललं जाऊ शकतं. आम्ही कार आणि बाईक विमा दोघांची खरेदी आणि रिन्यू करण्याची प्रक्रिया सरळ, सोपी आणि पूर्णपणे डिजीटल करण्यावर लक्षकेंद्रीत करत आहोत. पॉलिसी घेण्यासाठी केवळ दोन मिनिटांचा वेळ लागेल आणि ही त्वरित जारी केली जाईल.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.