Paytm पोस्टपेडच्या युझर्ससाठी भन्नाट ऑफर; महिन्याच्या बिलासाठी EMIचा पर्याय

Paytm पोस्टपेडच्या युझर्ससाठी भन्नाट ऑफर; महिन्याच्या बिलासाठी EMIचा पर्याय

Paytmने पोस्टपेड युझर्ससाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. ते महिन्याचं बिल इएमआयमध्ये रुपांतरित करू शकतात.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर: पेटीएमचे पोस्टपेड युझर्स त्यांचं मासिक बिल सोप्या इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट्समध्ये (EMI) रुपांतरित करू शकतात, असं पेटीएम कंपनीने जाहीर केलं आहे. या फीचरचा मुख्य उपयोग म्हणजे, पेटीएम पोस्टपेड युझर्स कोणत्याही बजेटच्या मर्यादेशिवाय प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतात. या इएमआयवर त्यांना खूप कमी व्याजदर लागू होणार आहे. पेटीएम कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, बिल तयार करण्याच्या पहिल्या सात दिवसांतच पोस्टपेड बीलचं सोप्या इएमआयमध्ये रुपांतर करता येईल. पेटीएम पोस्टपेड सेवा पेटीएम मॉल, उबर, मिंत्रा, लेन्सकार्ट, गाना, पेपरफ्राय, हंगरबॉक्स, पतंजली या ठिकाणी ग्राह्य आहे.

याव्यतिरिक्त, पेटीएम पोस्टपेड युझर्स रिलायन्स फ्रेश, हल्दीराम, अपोलो फार्मसी, क्रोमा आणि शॉपर्स स्टॉप यासारख्या इतर किरकोळ विक्रेत्यांकडूनही घरगुती वस्तू खरेदी करू शकतात. पेटीएमने एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, पेमेंटचा फ्लेक्सिब्ल ईएमआय मोड आपल्या युझर्सना सध्याच्या कोव्हिड-19 परिस्थितीत मदत करण्यासाठी सुरु केला आहे. क्रेडिट लिमिट वाढल्यावर ग्राहकांना दर महिन्याच्या खर्चासाठी पैसे बँकेतून काढण्याची गरज पडत नाही. हा विचार करून पेटीएम पोस्टपेडने ही क्रेडिट इएमआयची सोय उपलब्ध करून दिली आहे.  पेटीएम सेवेमध्ये एक लाख रुपयांपर्यंतचं  क्रेडिट लिमिट उपलब्ध आहे, जे वेळेवर परतफेड केल्यास वाढवता येऊ शकतं. सध्या, 7 दशलक्षाहून अधिक युझर्स पेटीएम पोस्टपेड सेवा वापरतात आणि चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीला एकूण 15 दशलक्ष युझर्स होण्याची आशा आहे.

पेटीएमनी स्पष्ट सांगितलं आहे की, पोस्टपेड सेवेची ही नवी इएमआय योजना  क्रेडीट लिमिटच्या तीन वेगवेगळ्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. लाईट, डिलाईट आणि एलिट. पोस्टपेड लाइट 20,000 रुपयांपर्यंत क्रेडिट लिमिट असेल. ही क्रेडिट स्कोअर नसलेल्या युझर्ससाठी हे डिझाइन केलं आहे. तर डिलाईट आणि एलिट वापरणाऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दरमहा 1 लाख रुपयांपर्यंतचं क्रेडिट लिमिट कंपनी देत आहे. यात प्रोसेसिंग किंवा कन्व्हेअन्स फी नसली तरीही घेतलेल्या क्रेडिटवर व्याज ग्राहकाला भरावं लागणार आहे. ईएमआय पर्यायाशिवाय पेटीएम आधीपासूनच यूपीआय, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग सारख्या पोस्टपेड बिल पेमेंटच्या सुविधा देतं. दोन लाख पेटीएम अँड्रॉइड पीओएस (पॉईंट ऑफ सेल) उपकरणांशी पोस्टपेड सेवा जोडण्याचा कंपनीचा प्रयत्न सुरू आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 25, 2020, 7:36 AM IST
Tags: Paytm

ताज्या बातम्या