नवी दिल्ली, 10 मार्च : डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमने
(Paytm) व्यापाऱ्यांसाठी पेटीएम फॉर बिजनेस अॅपमध्ये
(Paytm For Business app) मोठे बदल केले आहेत. त्यामुळे आता व्यावसायिक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट घेण्यासाठी आपल्या अँड्रॉईड फोनचाच वापर करू शकतील. म्हणजेच मोबाईल फोन आता पॉईंट ऑफ सेलप्रमाणे
(POS) काम करेल. त्यामुळे वेगळी मशिन ठेवण्याची गरज लागणार नाही. भारतीय रिजर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक सूचनांनुसार, याद्वारे व्यापारी पाच हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार करू शकतील.
यासाठी व्यापाऱ्यांना आपल्या अँड्रॉईड फोनवर पेटीएम फॉर बिजनेस अॅप डाउनलोड आणि अॅक्टिव्ह करावं लागेल. तसंच यासाठी अँड्रॉईड फोनमध्ये नियर फिल्ड कम्युनिकेशन किंवा एनएफसी असणं आवश्यक आहे. या अॅपवर कार्ड पेमेंट पर्याय असेल, जे व्यापऱ्यांना त्यांचे व्यापाराचे तपशील सत्यापित करण्यासाठी आणि सेवा सक्रिय करण्यासाठी सेटअप शुल्क भरण्याची परवानगी देतील.
ही सुविधा व्यापाऱ्यांच्या पसंतीस पडते आहे, कारण आता त्यांना प्रत्येक ठिकाणी मशीन ठेवण्याची गरज नसेल आणि यामुळे कॉन्टॅक्टलेस व्यवहाराला चालनाही मिळेल. ही सुविधा सर्व ठिकाणी छोटी दुकानं, हॉटेल, डिलिव्हरी आणि लॉजिस्टिकसाठीही वापरता येईल.
Paytm For Business app असं करेल काम -
समजा तुम्ही एखाद्या दुकानातून एखादी वस्तू खरेदी करत असाल, तर आतापर्यंत तुम्हाला पेटीएम पेमेंट करताना क्यूआर कोड स्कॅन करावा लागत होता किंवा पीओएस मशीनवर कार्ड स्वॅप करावं लागत होतं. परंतु आता या फीचरमुळे ज्या व्यापाऱ्यांनी ही सुविधा घेतली आहे, त्यांच्या मोबाईलवर कार्ड टच केल्यानंतर लगेच वाय-फायने आपोआप पेमेंट होईल. त्यामुळे पीन टाकण्याची गरज नाही. हे Paytm For Business app 11 भाषांमध्ये आहे.
दरम्यान, देशभरात 328 मिलियनहून अधिक सक्रिय पेटीएम वॉलेट आहेत. पेटीएम प्लॅटफॉर्मवर 145 मिलियनहून अधिक यूपीआय हँडल सक्रिय आहेत आणि 64 मिलियन बँक खाती जोडलेली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.