मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Paytm अलर्ट! तुम्हालाही कॅशबॅक ऑफरचा मेसेज आलाय का? सावध राहा, होऊ शकते फसवणूक

Paytm अलर्ट! तुम्हालाही कॅशबॅक ऑफरचा मेसेज आलाय का? सावध राहा, होऊ शकते फसवणूक

पेटीएमवरुन एक बनावट, फेक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात 2647 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जाण्याचं सांगण्यात येत आहे.

पेटीएमवरुन एक बनावट, फेक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात 2647 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जाण्याचं सांगण्यात येत आहे.

पेटीएमवरुन एक बनावट, फेक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात 2647 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जाण्याचं सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली, 1 जून: भारतातील डिजीटल पेमेंट कंपनी पेटीएमने (Paytm) आपल्या युजर्सला सतर्कतेचा इशारा दिला आहे. पेटीएमवरुन एक बनावट, फेक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात 2647 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जाण्याचं सांगण्यात येत आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे गेल्या काही महिन्यांपासून डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ऑनलाईन व्यवहारात फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. पेटीएमवरुन फ्रॉडचं नवं प्रकरण आता समोर आलं आहे.

फेक, बनावट वेबसाईटवरुन, फोनवर एक मेसेज पॉपअप होत आहे, ज्यात 'अभिनंदन, तुम्हाला पेटीएम स्क्रॅचगार्ड मिळालं आहे' असा मेसेज दिला जात आहे. युजरने यावर क्लिक केल्यानंतर, Paytm-cashoffer.com वर रिडायरेक्ट केलं जातं. याबाबत कंपनीचे सीईओ विजय शेखर यांनी युजर्सला सावध राहण्याचं सांगितलं आहे. त्यांनी ट्विटरवरही याबाबत माहिती दिली आहे. नव्या फ्रॉडमध्ये एका नकली पेटीएम वेबसाईटवरुन युजर्सला 2647 रुपये कॅशबॅक देण्याचं सांगितलं जात आहे.

(वाचा - दारू पिऊन गाडी चालवणं दूरच,आता ती स्टार्टच होणार नाही;विद्यार्थ्याने शोधला मार्ग)

पेटीएम स्क्रॅचगार्ड जिंकल्याचा युजरला मेसेज केला जातो. त्यावर क्लिक केल्यानंतर पुढील स्टेप्स सांगितल्या जातात. त्यानंतर युजर paytm-cashoffer.com नावाच्या साईटवर नेलं जातं. ही लिंक केवळ स्मार्टफोनवरच काम करते. या फेक साईटचं डिझाईन आणि पॅटर्न पूर्णपणे खऱ्या पेटीएम सारखचं वाटतं, त्यामुळे युजरला खरी आणि फेक साईट ओळखणंही कठीण होतं.

(वाचा - Facebook वर तुमचंही Fake Account ओपन झालंय? असं करा डिलीट)

त्याशिवाय, पैसे देण्याचं सांगून कोणी WhatsApp वर पाठवलेला क्यूआर कोड (QR code) स्कॅन करण्यासाठी सांगितला, तर सावध व्हा. हा फसवणुकीचा प्रकार असू शकतो. त्यावर विश्वास ठेऊ नका. सध्या WhatsApp द्वारे क्यूआर कोड पाठवून अनेकांची फसवणूक केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Cyber crime, Paytm, Paytm Money, Paytm offers, Tech news