Paytm युजर्सना मोठा झटका, प्ले स्टोअरवरून अ‍ॅप झालं गायब

Paytm युजर्सना मोठा झटका, प्ले स्टोअरवरून अ‍ॅप झालं गायब

वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचे हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर दिसत नाही आहे. पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीच्या इतर अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी पेटीएम (Paytm) आणि पेटीएम फर्स्ट गेम (Paytm First Game) हे दोन्ही अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे. वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचे हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर दिसत नाही आहे. पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीच्या इतर अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. मात्र Paytm आणि Paytm First Game हे दोन अ‍ॅप काढून टाकण्यात आले आहे.

गुगल प्ले स्टोअरने हे अ‍ॅप जुगारासंबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काढून टाकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुगलनं याआधी ऑनलाइन जुगाराला परवानगी देत नाही किंवा अशा अ‍ॅप्सना समर्थन देत नाही, असे सांगितले होते. त्यानंतर हे दोन्ही अ‍ॅप काढून टाकण्यात आले आहे.

दरम्यान, अद्याप Paytm कडून Google Play Store वरून अॅप काढून टाकण्याबाबत कोणतेही निवेदन आले नाही आहे. मात्र गूगलचे उपाध्यक्ष सुझान फ्रे यांनी लिहिले आहे की आम्ही ऑनलाइन कसिनोला परवानगी देत ​​नाही किंवा सट्टेबाजीची करणाऱ्या अ‍ॅप्सना मान्यता देत नाही.

याआधी माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला Paytm First Gameचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. मात्र त्यानंतर काही उद्योजकांनी सचिनने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. देशातील छोट्या व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) सचिनला एक पत्र लिहून विरोध दर्शविला होता.

(ही बातमी अपडेट होत आहे)

Published by: Priyanka Gawde
First published: September 18, 2020, 2:34 PM IST
Tags: Paytm

ताज्या बातम्या