मुंबई, 6 मार्च : पेटीएमने अमेझॉन आणि फ्लिपकार्ट प्लस या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सब्सक्रिप्शन लॉयल्टी प्रोग्राम 'पेटीएम फर्स्ट' नुकताच लॉन्च केला. पेटीएमच्या या नव्या सेवेमुळे आता एकाच ठिकणी मनोरंजन, शॉपिंग आणि फूड यासारखे अॅप वापरता येणार आहे. माहितीनुसार या अॅपच्या सब्सक्रायबर्सना पेटीएमकडून विशेष लाभ मिळाणार आहेत.
पेटीएमची एका वर्षाची सब्सक्रायबर फी 750 रुपये एवढी आहे. आताच्या या नव्या प्रोग्रामनुसार पेटीएममधूनच मनोरंजन, शॉपिंग आणि फूड अॅपचे सब्सक्रिप्शन घेतल्यास पेटीएमकडून 100 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. मात्र या कॅशबॅकला वेळेची मर्यादा असणार आहे. तसेच पेटीएम मॉलमधून शॉपिंग करणाऱ्या पेटीएम फर्स्टच्या सब्सक्रायबला अनलिमिटेड फ्री आणि प्रायॉरिटी शॉपिंग सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
पेटीएमकडून पेटीएम फर्स्ट सब्सक्रायबरला 12000 रुपयांपर्यंत ऑफर देण्यात येणार आहे. या ऑफरमधून 'उबर' अॅपचा वापर केल्यास ग्राहकाला 6000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. तसंच 'उबर इट्स'वरुन जेवण ऑर्डर केल्यास 2400 रुपयांचा कॅशबॅक मिळणार असल्याचं पेटीएमकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय पेटीएम फर्स्टच्या सब्सक्रायबरने पेटीएमद्वारे मुव्ही तिकीट बुक केल्यास त्याला 1500 रुपये कॅशबॅक मिळेल. ज्यात प्रत्येक महिन्यात मुव्ही तिकिटवर 100 रुपयांच्या कॅशबॅकचाही सामावेश आहे. तसंच आता पेटीएमने काही दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेनुसार पेटीएम युजर्स पेटीएममधून ई-चलन पेमेन्टही करू शकतात.
VIDEO: अक्षय कुमारची भन्नाट एन्ट्री; लवकरच झळकणार 'या' सिरीजमध्ये