Alert! Paytm, Google Pay मधून होतेय पैशांची चोरी; हॅकर्सची नवी चाल

Alert! Paytm, Google Pay मधून होतेय पैशांची चोरी; हॅकर्सची नवी चाल

तुम्हाला एखाद्या वस्तूची गरज असेल तर त्याबद्दल तुम्ही नेटवर सर्च करता. याचाच वापर करून ई वॉलेटच्या माध्यामातून फसवणूक केली जाते.

  • Share this:

एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी किंवा एखाद्याला पैसे द्यायचे असतील तर रोख रक्कम देण्याऐवजी डिजीटल पेमेंटचा वापर वाढला आहे. यामुळे रोख रक्कम जवळ बाळगण्याची आवश्यकता नाही. आपली अनेक कामे यामुळे सोपी झाली असली तरी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांमुळे धोकाही वाढला आहे. ई वॉलेटचा वापर करणाऱ्यांना हॅकर्स टार्गेट करत आहेत.

तुम्हाला एखाद्या वस्तूची गरज असेल तर त्याबद्दल तुम्ही नेटवर सर्च करता. त्यानंतर मिळालेल्या नंबर किंवा वेबसाइटवर संपर्क करता. याचाच वापर करून ई वॉलेटच्या माध्यामातून फसवणूक केली जाते.

फेक लिंकवर तुम्हाला काय हवं आहे असं विचारलं जातं. त्यानंतर एक फॉर्म भरायला सांगून ट्रायल किंवा टोकन मनी म्हणून 5-10 रुपये पाठवण्यास सांगतात. यातून तुमची माहिती, फोन नंबर आणि बँक डिटेल्स यांची माहिती घेतली जाते. तुम्ही पैसे पाठवल्यानतंर मिळालेल्या माहितीवरून खात्यावर असलेली रक्कम काढली जाते. हा फक्त एक मार्ग असून असे अनेक प्रकार आहेत ज्यातून ग्राहकांना फसवलं जातं.

सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ई वॉलेटवर अनेक हॅकर्सची नजर आहे. इंटरनेटवर अनेक खोट्या लिंक असतात. तुम्ही काहीही सर्च करता तेव्हा येणाऱ्या लिंकमध्ये त्यांचीही एक लिंक आणि नंबर दिसतो. ते खरं की खोटं ही सहजासहजी समजत नाही. त्यामुळे तुम्हाला खात्रीशीर माहिती असलेल्या अधिकृत लिंकवरूनच अशा प्रकारचे व्यवहार आणि माहितीची देवाण घेवाण करणं योग्य ठरेल.

First published: December 2, 2019, 8:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading