आता कमी डेटामध्ये पाहता येणार बरंच काही, Netflix वर येतंय नवं फीचर

आता कमी डेटामध्ये पाहता येणार बरंच काही, Netflix वर येतंय नवं फीचर

Netflix चं हे नवं फीचर XDA डेव्हलपर्सने स्पॉट केलं आहे, जे सद्यस्थितीत अंडर डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. यशस्वी डेव्हलपिंग आणि टेस्टिंग झाल्यानंतरच ते लागू केलं जाऊ शकतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : नेटफ्लिक्स अधिकाधिक युजर्सला आपल्या प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी नवनव्या स्किम, फीचर्स अपडेट करत आहे. आता नेटफ्लिक्सकडून आणखी एक नवं फीचर जोडलं जाणार आहे. Netflix चं हे नवं फीचर खासकरून अँड्रॉईड युजर्ससाठी असणार आहे. स्क्रिन टर्नऑफ असं या नव्या फीचरचं नाव आहे. या फीचरमुळे Netflix युजर्स कमी इंटरनेट डेटामध्ये अधिक मूव्ही, वेब सीरीज आणि इतर शोजंचा आनंद घेऊ शकतील.

यासाठी युजर्सला स्क्रिन टर्नऑफ असा ऑप्शन दिला जाईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्क्रिन टर्न ऑफ फीचरमुळे Netflix युजर्स दररोज काम करत असतानाही, वेब सीरीज ऐकू शकतात. म्हणजे Netflixचे शो आणि मूव्ही रेडिओप्रमाणे ऑडिओ मोडमध्ये ऐकू येतील आणि त्यासोबत फोनवर इतर ऍप्स वापरता येतील.

(वाचा - मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, तर जाणून घ्या डेटा कसा इरेज कराल?)

Netflix चं हे नवं फीचर XDA डेव्हलपर्सने स्पॉट केलं आहे, जे सद्यस्थितीत अंडर डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. स्क्रिन टर्नऑफ फीचरचं यशस्वी डेव्हलपिंग आणि टेस्टिंग झाल्यानंतरच ते लागू केलं जाऊ शकतं. Netflix चं हे नवं फीचर मल्टीटास्किंग करणाऱ्या अँड्रॉईड युजर्ससाठी फायदेशीर ठरू शकतं.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डेटा वाचवण्यासाठी युजर्स आपल्या आवडीच्या शोचे व्हिडीओ बंद करून केवळ ऐकू शकतात. कंपनी सर्व युजर्ससाठी बॅकग्राउंड प्लेसाठी ऑडिओ-ओनली मोड रोलआउट करण्याची योजना आखत आहे.

फ्री सब्सक्रिप्शन -

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन घेण्यासाठी चांगली संधी आहे. जर नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन नसेल, तर कंपनी फ्रीमध्ये सब्सक्रिप्शन देतेय. नेटफ्लिक्स एक ऑफर घेऊन येत आहे, ज्यात वीकेंडला फ्री स्ट्रिमिंगचा लाभ घेता येणार आहे. कंपनी ही ऑफर स्ट्रिमफेस्ट (StreamFest) अंतर्गत जाहीर करणार आहे.

(वाचा - Cyber Fraud: बँक खात्यावर चोरट्यांचा डल्ला; टेन्शन घेऊ नका, असे परत मिळतील पैसे)

इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, सध्या केवळ भारतीय ग्राहकांसाठी ही ऑफर दिली जात आहे, याची सुरुवात 4 डिसेंबरपासून होणार आहे. ही ऑफर केवळ दोन दिवस, वीकेंडसाठी आहे. यापूर्वी कंपनी एक महिन्याचं ट्रायल फ्री देत होती, मात्र आता ही ट्रायल ऑफर रद्द करण्यात आली आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 30, 2020, 12:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या