Home /News /technology /

OPPO चा नवा Reno 3 Pro स्मार्टफोन भारतात लॉंच, भन्नाट सेल्फी कॅमेरा हेच आहे वैशिष्ट्य

OPPO चा नवा Reno 3 Pro स्मार्टफोन भारतात लॉंच, भन्नाट सेल्फी कॅमेरा हेच आहे वैशिष्ट्य

ओप्पो कंपनीनं भारतात Reno सीरीझचा नवा स्मार्टफोन लॉंच केला आहे. Oppo Reno 3 Pro या फोनमधील 44 मेगापिक्सेलचा डुअल सेल्फी कॅमेरा खास आहे.

    मुंबई, 2 मार्च: ओप्पो कंपनीनं भारतात Reno सीरीझचा नवा स्मार्टफोन लॉंच केला आहे. Oppo Reno 3 Pro या फोनमधील सेल्फी कॅमेरा खास आहे. 44 मेगापिक्सेलचा डुअल सेल्फी कॅमेरा असलेला हा पहिलाच फोन आहे. ओप्पोने हा फोन गेल्यावर्षी चीनमध्ये लाँच केला होता. याचा सेल्फी कॅमेराचा इतर कंपन्यांना टक्कर देणार आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सेल अल्ट्राक्लियर प्राइमरी कॅमेरा आहे. तर 13  मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स या फोनमध्ये देण्यात आली आहे त्याचसोबत 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स या नव्या स्मार्टफोनमध्ये असणार आहे. 2 मेगापिक्सल मोनो लेन्ससोबतचं या फोनमध्ये 3 कॅमेरा असलेला सेटअप यात देण्यात आला आहे. सध्या बाजारात ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी कंपन्या आपल्या नव्या फोनच्या फीचरमध्ये वेगवेगळे बदल करत असतात. ओप्पोनं तर आता चक्क 44 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असलेला Oppo Reno 3 Pro हा फोन लॉंच केला आहे. वाचा :Honda City लव्हर्सना लवकरच मिळणार सरप्राइज, मार्चमध्ये लॉंच होणार ‘या’ कार या फोनमध्ये ग्राहकांना 3 कलर उपलब्ध होणार आहे. ऑरोरा ब्लू, मिडनाइट ब्लॅक, स्काई व्हाईट हे पर्याय ग्राहकांना देण्यात आलेत. 30 हजारांपर्यंत ओप्पोचा हा नवा फोन उपलब्ध करण्यात आलाय. Oppo Reno 3 मध्ये आहेत हे फीचर: Oppo Reno 3 Pro मध्ये 12GB रॅम देण्यात आला आहे. यात 256GB ची फोन मेमरी आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चीनमधील याच मॉडेलवर 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला होता. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, 13 मेगापिक्सलचा टेलिफोटो आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाइट सेन्सर दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा AMOLED डिस्प्ले इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.  यात 4025mAh बॅटरी आहे जी 30W फास्ट चार्जिंग होणार आहे. भारतात या फोनची बुकिंग मोठ्याप्रमाणावर झाली आहे. इतर बातम्या Jio ची बेस्ट ऑफर! 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळणार दुप्पट फायदा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Camera, Mobile phone, Mobile tech, Oppo

    पुढील बातम्या