OPPO Reno बद्दल पहिली प्रतिक्रिया: स्पर्धेच्या पलीकडे जाणारे झूमिंग

OPPO Reno बद्दल पहिली प्रतिक्रिया: स्पर्धेच्या पलीकडे जाणारे झूमिंग

OPPO ह्या आघाडीच्या जागतिक स्मार्टफोन ब्रँडची सर्वांत अद्ययावत ऑफर असलेल्या Reno 10x झूमने जगभरात मोठी उडी घेतली आहे

  • Share this:

मुंबई, 07 जून : मोठ्या आणि इमर्सिव्ह डिस्प्लेसह, स्पष्ट मिनिमलिस्टिक लूकसह, मोठी बॅटरी व अतिशय अद्ययावत 10 x हायब्रिड झूम कॅमेराच्या क्षमतांसह OPPO Reno 10 x झूमने प्रीमियम स्मार्टफोन बाजारपेठ काबीज केली आहे.

OPPO ह्या आघाडीच्या जागतिक स्मार्टफोन ब्रँडची सर्वांत अद्ययावत ऑफर असलेल्या Reno 10x झूमने जगभरात मोठी उडी घेतली आहे आणि त्याने फोटोग्राफी आणि मोबाईल मनोरंजनाला आणखी वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 10x हायब्रिड झूम तंत्रज्ञान आहे व त्यासह जगातले पहिले पेरीस्कोप लेन्स आहे व हे अतिशय सुंदर अशा डिझाईनच्या पॅकेजमध्ये व्यवस्थित प्रकारे जोडले गेलेले आहे.

स्मार्टफोन सेगमेंटमधील गेम- चेंजर मानला गेलेल्या OPPO Reno 10 x झूमला आत्तापर्यंत जगभरात अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे. भारतामध्ये, फ्रेश, निटनेटक्या व वायब्रंट डिझाईनच्या Reno 10 x झूमने प्रीमियम स्मार्टफोन सेग्मेंटमधील प्लेयर्सचे स्थान प्राप्त केले आहे.

फोटो- फिनिश विन

10x हायब्रिड झूम हा OPPO च्या दलनातील नवीन उत्पादनामधील अतिशय पुढे जाणारे व विनर ठरणारे वैशिष्ट्य आहे. तीन लेन्सेस मुख्य कॅमेरा मॉड्युलच्या पाठीमागे ठेवलेले आहेत. प्रायमरी कॅमेरा 48-मेगापिक्सल IMX586 f/1.7 सेन्सर असून त्यासह OIS आणि PDAF आहेत. 13-मेगापिक्सल पेरीस्कोप टेलिफोटो लेन्सद्वारे युजर्स 10x (दहा पट मोठे) हायब्रिड झूम घेऊ शकतात व डिजिटल प्रकारे 60x इतके झूम करू शकतात. आणि 8-मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा ह्या तीन कॅमेरा प्रणालीची पूर्तता करतो.

Reno 10x झूममध्ये वेगवेगळ्या फोकल रेंजेसच्या तीन लेन्सेसना एकत्र करून 16-160 मिमी इतकी एकूण फोकल लेंथ प्राप्त केली जाते. शार्प झूम केलेले शॉटस घेण्याबरोबरच, ह्या स्मार्टफोनमध्ये कमी उजेडाच्या परिस्थितीतही अतिशय थक्क करणारे तपशील आहेत. त्यातील अल्ट्रा नाईट मोड 2.0 मुळे घेता येऊ शकतात. रात्रीच्या फोटोग्राफीसाठीच्या एआय पोर्ट्रेट ऑप्टिमायजेशनमुळे विषय आणि पार्श्वभूमीमध्ये फरक केला जाऊ शकतो व त्यामुळे स्किन टोन तशीच राहील, ह्याची खात्री‌ घेता येते व प्रोफेशनल दर्जाचा फोटो घेता येतो.

हा स्मार्टफोन निवडीसाठी उपलब्ध असलेल्या 5 स्टायलिश सेटिंग्जमधून व्यावसायिक पोर्ट्रेट फोटोज सहजपणे घेण्यास सक्षम आहे. डॅझल कलर मोडमुळे जिवंत- सदृश विविड कलर्ससाठी पिक्सल स्तरावरील कलर रिस्टोरेशन अप्लाय होते.

ह्या फोनच्या खास वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याचा शार्कच्या कल्ल्याप्रमाणे समोर येणारा फ्रंट कॅमेरा आहे, हा एक अतिशय उतम प्रकारे बनवलेला 16-मेगापिक्सल कॅमेरा आहे जो 0.8 सेकंदांमध्ये बाहेर निघतो. बाजूवरून 11 अंशाच्या कोनातून हा कॅमेरा वर येतो व हा कोन सेल्फी घेण्यासाठी सर्वोत्तम कोन मानला जातो.

बॉक्समध्ये काय काय आहे?

सध्या, OPPO Reno 10x झूम हा भारतामध्ये जेट ब्लॅक आणि ओशन ग्रीन ह्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेले बेस मॉडेल रू. 39,990 ला उपलब्ध आहे आणि 8GB RAM 256GB ROM व्हेरिएंट हे रू. 49,990 दराने मिळते. भारतामध्ये ह्या डिव्हाईसच्या विक्रीला 7 जूनपासून  सुरुवात झाली.

लूकची चाचणी

स्मूथ टच आणि पातळ सिलहुटसाठी Reno 10 X झूम हा 3D कर्व असलेल्या ग्लासमध्ये येतो व त्यासह बॅक कव्हरला असलेले कॅमेरा फ्लश येते. हा स्मार्टफोन बेझेल- नसलेला डिस्प्ले देतो आणि एक शार्कच्या कल्ल्याप्रमाणे वर येणारा कॅमेरा त्यात आहे. एक ईअरपीस आणि लाउडस्पीकर डिस्प्लेवरील पातळ स्लॉटमध्ये ठेवले गेले आहेत ज्यामुळे डिव्हाईसला स्टीरिओ स्पीकरचा आवाज मिळतो.

Reno 10x झूममध्ये 6.6-इंच FHD डिस्प्ले, AMOLED पॅनल्स आहेत व त्यामध्ये फिंगरप्रिंट सेंसर्सना इन- डिस्प्ले समर्थन आहे व तो टिकाऊ, स्क्रॅचरोधक कॉर्निंग गोरील्ला ग्लास 6 द्वारे सुरक्षित केला गेलेला आहे.

हूडच्या आतमध्ये

सर्वोत्तम व आघाडीच्या क्वॅलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर आणि 8 GB RAM सह येणारा आकर्षक अशा Reno 10x झूममध्ये चौथ्या जनरेशनमधील AI इंजिन समाविष्ट आहे. 4,065

mAh बॅटरी एका पूर्ण दिवसासाठी पुरेशी ठरते व तिच्यासह OPPO's VOOC 3.0 फास्ट चार्जिंग दिले गेले आहे. Android 9 ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित ColorOS 6 सह हा सज्ज आहे.

गेम ऑन

फोटोबरोबरच हा डिव्हाईस गेमर्सनाही समाधान देतो. ह्या स्मार्टफोनमध्ये सिस्टीम लेव्हलवरील ऑप्टिमायजेशन सोल्युशन म्हणजे हायपर बूस्ट आहे. OPPO द्वारे स्वतंत्र प्रकारे विकसित केलेल्या ह्या सोल्युशनमध्ये तीन मॉड्युल्स आहेत: गेम बूस्ट, सिस्टीम बूस्ट आणि App बूस्ट आहे जे गेमचा अनुभव, सिस्टीमची स्पीड आणि App सुरू होण्याची स्पीड ह्या संदर्भात मोठ्या प्रमाणात सुधारणा देतात.

गेम्ससाठी TV Rheinland च्या उच्च परफॉर्मंसचे सर्टिफिकेशन प्राप्त होणारा पहिला मोबाईल फोन होण्याचा मानसुद्धा ह्या सिरीजला मिळाला आहे.

तसेच, Reno 10x झूममध्ये थर्मल जेलसोबत ग्रॅफाईट शीट, कॉपर पाईप लिक्विड कूलिंग आणि ट्राय- कूलिंग कंट्रोल आहे ज्याद्वारे स्मार्टफोनच्या तपमानाचे प्रभावी व्यवस्थापन केले जाते व ओव्हरहिटींगची शक्यता टाळली जाते.

सुरुवातीचा कल

OPPO रेनो 10x झूम हा त्याच्या आकर्षक टायटलच्या योग्य आहे. अतिशय चांगले डिजाईन असलेला, उत्तम प्रकारे बनवलेला व योग्य दरासह असलेला तो अतिशय उत्कृष्ट आहे. सहजता आणि तपशीलांचे संतुलन असलेला तो मध्य- श्रेणीतील स्मार्टफोन ऑफरिंगमध्ये सर्वोच्च जागी जाण्यास पात्र आहे. त्याच्या ट्रिपल कॅमेरा सेट अपमुळे व दरामुळे OPPO Reno 10x झूम फॅशनच्या बाबतीत पुढे असलेल्या व गुणवत्तेची अपेक्षा असलेल्या व टेक- सॅव्ही पिढीसाठी एक सशक्त पर्याय ठरतो.

First published: June 7, 2019, 4:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading