OPPO F11 Proच्या मार्वल्स एवेंजर्स लिमिटेड एडिशन फोनचे 'हे' आहेत शानदार फीचर्स

OPPO F11 Proच्या मार्वल्स एवेंजर्स लिमिटेड एडिशन फोनचे 'हे' आहेत शानदार फीचर्स

एवेंजर्स एंडगेम सिनेमा देशभरात सुपर हिट झाला. याचाच उपयोग करत OPPO आणि मार्वल स्टुडिओजनी OPPO F11 Pro मार्वल्स एवेंजर्स लिमिटेड एडिशन फोन लाँच केलाय.

  • Share this:

मुंबई, 06 मे : एवेंजर्स एंडगेम सिनेमा देशभरात सुपर हिट झाला. याचाच उपयोग करत OPPO आणि मार्वल स्टुडिओजनी OPPO F11 Pro मार्वल्स एवेंजर्स लिमिटेड एडिशन फोन लाँच केलाय. या सुपरहिरो फोनची लोकप्रियता किती अफाट आहे पाहा. अमॅझोनवर 1 मेपासून या फोनची विक्री सुरू झाल्या झाल्या एका तासात फोन विकला गेला. इतक्या लवकर सोल्ड आऊट होण्याचं हे रेकाॅर्ड म्हणजे स्मार्टफोन आणि एवेंजर्स एंडगेम सिनेमाची लोकप्रियता. इतका मोठा प्रतिसाद पाहता या लिमिटेड एडिशन फोनच्या दोन्ही ब्रँड्सच्या फॅन्सना तो आवडल्याचं कळतंय. हा फोन आधीचे सर्व रेकाॅर्ड तोडेल हेच दिसतंय. हा अॅक्शनपॅक्ड फोन 27,990 रुपयांना मिळतोय. या किमतीमुळेच फोन जास्त लोकप्रिय झालाय.

शानदार डिझाइन - हा फोन कॅप्टन अमेरिकेच्या वाॅरसूटमुळे प्रभावित झालाय. हा फोन चमकत्या युनिक निळ्या रंगात आहे. याच्या बॅक पॅनलमध्ये हेक्सागाॅनल डिझाइन आणि  एवेंजर्स लोगो आहे. फोनच्या कॅमेरा माॅड्युलच्या वर छोटा एवेंजर्स लोगो तुमचं लक्ष वेधून घेतो. फोनसोबत एक केस आहे. त्यात कॅप्टन अमेरिकाच्या शिल्डच्या आकारासारखी रिंग आहे. त्याबरोबर मिळणारा कलेक्टर बॅज सर्व मार्वल फॅन्ससाठी गेम चेंजर असेल. आणि फॅन्स ते मिळवायचा प्रयत्न करतील नक्की. आपल्या स्टाइलिश बाॅडीसोबत 6.5 इंच डिस्प्ले असलेला फोन तुम्ही हातात घेतलात तर हरखूनच जाल.

फोनची रिटेल पॅकेजिंग एका स्पेशल निळ्या रंगाच्या केसबरोबर नावीन्यपूर्ण वाटते. डिव्हाइसला सुरक्षित ठेवण्यासाठी कॅप्टन अमेरिका शिल्डही आहेच. फोनसोबत ओरिजनल एवेंजर्स  ग्रुपचे सर्व बॅजही असतील. ते एका कलेक्शन सर्टिफिकेटबरोबर मिळतील. OPPO F11Pro मार्वल्स एवेंजर्स  लिमिटेड एडिशन फोनचं आकर्षक डिझाइन आणि शानदार फीचर्स सर्व मार्वल फॅन्सना भुरळ पाडतील.

खूप चालणारी 4000 mAh ची बॅटरी - या बॅटरीमुळे तुम्हाला सोशल मीडियावर कितीही वेळ घालवला तरी फोन बंद पडण्याची चिंता राहणार नाही. एवेंजर्स एंडगेम सिनेमातल्या सुपरहिरोसारखं दमदार V00C 3.0 फीचर तुमचा फोन पटकन चार्ज करेल. याची बॅटरी इतकी दमदार आहे  की तुम्ही चिंता न करता नेटफ्लिक्सवर तुमचे आवडते एपिसोड्स लागोपाठ पाहू शकाल.

चांगल्या सेल्फीसाठी मोटोराइज्झ रायझिंग कॅमेरा - हल्ली कुठलाही स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहक कॅमेरा कसा आहे ते पाहतात. OPPP F11 Pro मार्वल एवेंजर्स लिमिटेड एडिशनचा मोटाराइज्ड राइझिंग कॅमरा फोनच्या वरच्या भागातून बाहेर येतो आणि अप्रतिम फोटो काढतो. त्याचा 16  मेगाफिक्सल शार्प सेंसर फोकस करायला मदत करतो. प्रभावी स्क्रीन फ्लॅश असल्यानं कमी उजेडातही चांगला फोटो येतो. याचा अल्ट्रा नाइट मोड तुम्हाला रात्रीही सुंदर फोटो काढायला मदत करेल. या फोनचा लेझर शार्प रियर 48 मेगापिक्सल कॅमेरा याला लाजवाब बनवतो. याचं AI beautification फीचर तुमचा फोटो सुंदर बनवतो.

गेमिंगची आवड असणाऱ्यांसाठी सुंदर अनुभव- या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो P70 प्लॅटफाॅर्म आहे. तो सुपरस्टार डिव्हाइसचं उत्तम फीचर म्हणता येईल. यात तुम्हाला 6 GB RAM आणि 128 GB इंटरनल मेमरी असते.यातलं थर्मो मॅनेजमेंट तुमच्या सुपरहिरो फोनला बऱ्याच वेळच्या गेमिंग सेशन्सनंही गरम होऊ देत नाही. फोनचा रियल पॅनल तुम्हाला नेहमीच थंडावा जाणवून देईल. या स्मार्टफोनचा ब्लाॅक्ड नोटिफिकेशन फीचर गेमिंगच्या वेळी तुम्हाला डिस्टर्ब होण्यापासून वाचवेल.

शानदार साॅफ्टवेअर सपोर्ट - OPPP F 11 Pro मार्वल्स एवेंजर्स लिमिटेड एडिशन  या फोनमध्ये Colour 0S6 साॅफ्टवेअर आहे. जे एंड्राॅइडचं अत्याधुनिक साॅफ्टवेअर आहे. यात एंड्राॅइड 9.0 पाई ओएस एक असा युजर इंटरफेस आहे, जो तुमच्या फोनला बहारदार बनवतो. फोनच्या नोटिफिकेशन शेडमध्ये टाॅगल स्विच आहे. चुकून कुठल्या नोटिफिकेशनला क्लिक केल्यानंतर होणाऱ्या गोंधळापासून बचाव करतं. याच्या स्क्रीनचा ब्राइटनेस तुम्ही एका स्लायडरमुळे अॅडजस्ट करू शकता. तो स्क्रिनच्या खाली आहे आणि यामुळेच तुम्ही एका हातानं फोन आॅपरेट करू शकता.

फोनचा स्मार्ट रायडिंग मोड तुमच्या आतल्या बायकर्सचा योग्य साथी बनतो. याचा हायपरबुस्ट परफाॅर्मन्स एक्सिलरेटर फोनची कामगिरी उत्तम बनवतो. हा सिस्टिम रिसोर्सेजला अशा अॅप्लिकेशनमध्ये ठेवतो, जो फोनची कामगिरी उत्कृष्ठ बनवतो. या स्मार्टफोनसाठी कंपनीनं अनेक वर्ष रिसर्च केलाय. ग्राहकांच्या मागणीनुसार, आवडीनुसार बदल केलेत.

इतक्या जलद विक्री होणाऱ्या फोनवरून हेच जाणवतं की OPPO F11 Proमार्वल्स एवेंजर्स लिमिटेड एडिशन फोन एवेंजर्स फॅन्सना आवडतोय. आकर्षित करतोय. चांगली क्वालिटी, साॅलिड फीचर्स आणि सर्वात महत्त्वाचा मार्वल्स एवेंजर्सचा अनुभव तुम्हाला या दमदार फोनमध्ये मिळेल.

VIDEO: '...पण जबरदस्तीनं पंजाचं बटण दाबायला लावलं' आजीबाईंचा गंभीर आरोप

First published: May 6, 2019, 1:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading