मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /ऑर्डर केला iPhone 13 आणि डिलिव्हरी मिळाली.... ऑनलाईन शॉपिंगमुळे तरुणाला Jackpot

ऑर्डर केला iPhone 13 आणि डिलिव्हरी मिळाली.... ऑनलाईन शॉपिंगमुळे तरुणाला Jackpot

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या व्यक्तीनं त्याच्यासोबत घडलेल्या गोष्टींचा पुरावा देखील स्क्रीनशॉर्ट म्हणून शेअर केला आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 06 ऑक्टोबर : अलीकडच्या काही वर्षांत ई-कॉमर्स कंपन्यांचे सेल हे लोकांना आपल्याकडे वळवण्याचं काम करत आहेत. खरंतर सणासुदीच्या काळात या ऑनलाईक कंपन्या ग्राहकांना भरभरुन सवलती देतात. ज्यामुळे बहुतांश लोक हे ऑनलाईन वस्तू विकत घेतात. तुम्ही देखील दसरा किंवा पाडव्याला ऑनलाईन वस्तू मागवली असेल किंवा असे काही लोक असतील जे या सेलची वाट पाहत असतील. अशा सेलमध्ये सर्वांनाच मोठी सवलत मिळत असते; मात्र यंदाच्या या सेलमध्ये एका ग्राहकाला जणू जॅकपॉटच लागला आहे.

  त्याने आयफोन 13 मागवला असताना फ्लिपकार्टकडून त्याला लेटेस्ट आयफोन 14 मिळाला आहे. एका ट्विटर युझरने आपल्या एका फॉलोअरच्या बाबतीत असा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. तसंच, पुराव्यादाखल काही स्क्रीनशॉट्सही शेअर करण्यात आले आहेत.

  सध्या फ्लिपकार्टवर दसरा सेल सुरू असून, काही दिवसांपूर्वी बिग बिलियन डेज सेल सुरू होता. दसरा सेलमध्ये आयफोन 13 या मॉडेलची किंमत 57 हजार 240 रुपये एवढी आहे. त्याआधीच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये आयफोन 13 मॉडेलची किंमत सुमारे 50 हजार रुपये ठेवण्यात आली होती. अ‍ॅपलच्या अधिकृत वेबसाइटवर त्या मॉडेलची किंमत तब्बल 69 हजार 900 रुपये एवढी आहे. त्यामुळे फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजमध्ये कित्येक ग्राहकांनी या सवलतीचा फायदा घेतला.

  हे वाचा : ऑनलाईन शॉपिंग करतना कधीही होणार नाही फसवणूक, कंपनीकडून ग्राहकांसाठी नवीन सुविधा बाजारात

  त्यातल्याच एका ग्राहकाचं नशीब मात्र खूपच फळफळलं. त्याने आयफोन 13ची ऑर्डर केलेली असताना त्याला लेटेस्ट आयफोन 14 मॉडेल मिळालं. त्या ग्राहकाने आपली ऑर्डर, तसंच रिटेल बॉक्सचे स्क्रीनशॉट्स पुराव्यादाखल अपलोड केले आहेत. त्यातून हे दिसून येतं, की त्या ग्राहकाने 2021मध्ये लाँच झालेल्या आयफोन 13 या मॉडेलची खरेदी केली असून, त्यासाठी 49 हजार 019 रुपयांचं पेमेंट केलं आहे; मात्र त्या ऑर्डरवर त्याला फ्लिपकार्टकडून लेटेस्ट आयफोन 14 पाठवण्यात आला, असा त्याचा दावा आहे.

  त्याचा दावा खरा असला, तर त्याला मोठाच जॅकपॉट लागला आहे. कारण आयफोन 14ची प्रारंभिक किंमत तब्बल 79,900 रुपये आहे. कारण तो फोन त्याला मूळ किमतीपेक्षा तब्बल 30 हजार रुपये कमी किमतीत मिळाला आहे.

  आयफोन 14ची वैशिष्ट्यं

  आयफोन 13च्या तुलनेत आयफोन 14 अधिक उत्तम अनुभव देतो. आयफोन 14मध्ये आयफोन 13 प्रो मॉडेलप्रमाणे पाच कोअर असलेला जीपीयू चिपसेट आहे. आयफोन 13 स्टँडर्ड मॉडेलमध्ये चार कोअर जीपीयू चिपसेट आहे. 2022च्या आयफोन 14 मॉडेलमध्ये मोठ्या क्षमतेची बॅटरी आहे.

  तसंच, कॅमेरा सेन्सरही आयफोन 13च्या तुलनेत मोठा असून, 12 मेगापिक्सेल रिझॉल्युशन आहे. आयफोन 13मध्ये 4 जीबी रॅम आहे, तर आयफोन 14मध्ये 6 जीबी रॅम आहे. तसंच, आयफोन 14च्या कॅमेरामध्ये अ‍ॅक्शन मोड व्हिडिओ रेकॉर्डिंग फीचर आणि iOS16 सह येणारी नवी फीचर्स आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Money, Online fraud, Online shopping