मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

गुगल प्ले स्टोरला टक्कर देण्यासाठी Paytmचं मेड इन इंडिया Mini App Store

गुगल प्ले स्टोरला टक्कर देण्यासाठी Paytmचं मेड इन इंडिया Mini App Store

पेटीएमने Paytm गुगलला टक्कर देण्यासाठी सोमवारी इंडियन डेव्हलपर्ससाठी Indian developers मिनी ऍप स्टोर Paytm Mini App store लॉन्च केलं आहे.

    मुंबई, 5 ऑक्टोबर : पेटीएमने Paytm गुगलला टक्कर देण्यासाठी सोमवारी इंडियन डेव्हलपर्ससाठी Indian developers मिनी ऍप स्टोर Paytm Mini App store लॉन्च केलं आहे. गुगलने Google प्ले स्टोरवरुन पेटीएम काही दिवसांसाठी हटवल्यानंतर, पेटीएमने स्वत:चं स्टोर लॉन्च केलं आहे. आतापर्यंत बाजारात गुगलचा दबदबा होता, परंतु पेटीएमचं मिनी ऍप स्टोर लॉन्च झाल्यानंतर युजर्सला आता गुगल प्ले स्टोरशिवाय आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. मिनी ऍप स्टोर ओपन सोर्स टेक्नोलॉजीप्रमाणे, HTML आणि जावास्क्रिप्टला एकीकृत करेल आणि पेटीएम ऍपवर 150 मिलियन ऍक्टिव्ह युजर्स देईल. वेबसाईटवर काही ऍप्स पाहायला मिळत आहेत, ज्यात 1MG, NetMeds, Decathlon, Domino’s Pizza, FreshMenu आणि NoBroker सह 300 हून अधिक ऍप सामिल आहेत. पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, डेव्हलपर्स या प्लॅटफॉर्मवर पेटीएम वॉलेट आणि UPI द्वारे 0टक्के पेमेंट चार्जवर ऍप्स डिस्ट्रिब्यूट करु शकतात. तर क्रेडिड कार्डद्वारे ऍप डेव्हलपर्सला 2टक्के चार्ज द्यावा लागेल. पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर यांनी सांगितलं की, आम्ही आज असं काही लॉन्च करत आहोत ज्यामुळे प्रत्येक भारतीय डेव्हलपर्ससाठी एक नवी संधी निर्माण होत आहे. पेटीएम मिनि ऍप स्टोरमुळे तरुण भारतीय डेव्हलपर्सला फायदा होणार असून नवीन इनोवेटिव्ह तयार करण्यासाठी पेमेंट करण्याचा अधिकार देतो आहोत.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Paytm

    पुढील बातम्या