मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google Pay, PhonePe युजर्स Alert! UPI पेमेंट करताना सावध राहा, अन्यथा...

Google Pay, PhonePe युजर्स Alert! UPI पेमेंट करताना सावध राहा, अन्यथा...

UPI पेमेंट करणं सोपं आणि अतिशय फास्ट असल्याने याचा मोठा वापर केला जातो. परंतु पेमेंट करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

UPI पेमेंट करणं सोपं आणि अतिशय फास्ट असल्याने याचा मोठा वापर केला जातो. परंतु पेमेंट करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

UPI पेमेंट करणं सोपं आणि अतिशय फास्ट असल्याने याचा मोठा वापर केला जातो. परंतु पेमेंट करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : देशात डिजीटल ट्रान्झेक्शन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात अनेक युजर्स PhonePe आणि Google Pay द्वारे यूनायटेड पेमेंट्स इंटरफेसचा वापर करुन ऑनलाइन पेमेंट करतात. UPI पेमेंट करणं सोपं आणि अतिशय फास्ट असल्याने याचा मोठा वापर केला जातो. परंतु पेमेंट करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

अनेक जण ऑनलाइन पेमेंट करताना बेजबाबदारपणा करतात त्याचा मोठा फटका बसू शकतो. परंतु सिक्योरिटी प्रोटोकॉलकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

अनोळखी लिंक -

UPI पेमेंट करताना हॅकर्सकडून अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. हॅकर्स युजर्सला फेक लिंक शेअर करुन फेक App डाउनलोड करण्यासाठी सांगतात. परंतु कोणीही पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. पर्सनल डिटेल्स, बँक डिटेल्स, PIN शेअर करू नका. कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था पर्सनल डिटेल्स मागत नाही, त्यामुळे फोनवर, मेसेजवर डिटेल्स मागितल्यास सावध व्हा.

तुमच्याकडचं सोनं खरं की खोटं? जाणून घ्या या App द्वारे Gold ची गुणवत्ता

UPI अ‍ॅड्रेस -

सर्वात आधी UPI Account आणि Address सिक्योर करणं गरजेचं आहे. कोणत्याही व्यक्तीसोबत UPI ID आणि Address शेअर करू नका. त्याशिवाय कोणत्याही पेमेंट किंवा बँक अ‍ॅप्लिकेशनद्वारे इतर व्यक्तींना आपलं UPI अकाउंट अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी देऊ नये.

भारतात Mobile Number 10 अंकीच का असतो? जाणून घ्या काय आहे यामागचं कारण

Screen Lock -

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये UPI App असेल, तर पासवर्ड स्ट्राँग ठेवणं गरजेचं आहे. अनेक लोक UPI द्वारे पेमेंट करतात पण त्याचा पासवर्ड सोपा किंवा केवळ पॅटर्न लॉक ठेवतात. परंतु Google Pay, PhonePe चा वापर करताना एक स्ट्राँग पिन सेट करणं आवश्यक आहे. PIN तुमची बर्थ डेट, वर्ष किंवा मोबाइल नंबर असू नये. PIN कोणाशीही शेअर करू नका.

First published:
top videos

    Tags: Online fraud, Online payments, Tech news, Upi