Home /News /technology /

तुम्ही Google Pay वापरता का? युजर्सला मिळणार ही नवी सुविधा, Payment करणं होणार आणखी सोपं

तुम्ही Google Pay वापरता का? युजर्सला मिळणार ही नवी सुविधा, Payment करणं होणार आणखी सोपं

गुगल पे लवकरच NFC सुविधा सुरू करू शकत असल्याचं सांगण्यात आलं आहे. एनएफसी (NFC) कॉन्टॅक्टलेस पेमेंट (Contactless Payment) करण्याची परवानगी देतं, जिथे युजर्सला कार्ड स्वाईप करण्याची गरज लागत नाही.

  नवी दिल्ली, 5 मे : गुगल पे (Google Pay) आपल्या अ‍ॅपवर (App) पेमेंटसाठीचे (Payment) अनेक नवे अपडेट करत असतं. याची सुरुवात UPI (यूनिफाईड पेमेंट इंटरफेस) ने झाली होती. त्यानंतर App ने युजर्सला आपलं क्रेडिट कार्ड जोडण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर अ‍ॅपचा लोगो आणि इतरही काही बदल करण्यात आले होते. आता गुगल पे लवकर एनएफसी (NFC) चा वापर करुन पेमेंट सुरू करू शकतं. कसं करता येई NFC ने Payment - Android Police नुसार, गुगल पे लवकरच NFC सुविधा सुरू करू शकत असल्याचं सांगण्यात आलं आहे. एनएफसी (NFC) कॉन्टॅक्टलेस पेमेंट (Contactless Payment) करण्याची परवानगी देतं, जिथे युजर्सला कार्ड स्वाईप करण्याची गरज लागत नाही. तसंच सपोर्ट पेजनुसार, ज्यावेळी युजर पेमेंटवर टॅप करेल, त्यावेळी Google Pay App स्वत:हून ओपन होईल. युजरला पेमेंटची पुष्टी करण्यासाठी Proceed वर टॅप करावं लागेल. सध्या केवळ पाइन लॅब टर्मिनल NFC ऑप्शन सपोर्ट करतं. एनएफसी सक्षम व्यवहार अधिक सहज आणि सुविधाजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेक फिनटेक कंपन्या एनएफसी पेमेंटवर काम करत आहेत, कारण हे इंटरनेट कनेक्शनशिवायच ट्रान्झेक्शनची परवानगी देतं.

  (वाचा - Gmail अकाउंट हॅक झाल्यास असं करा रिकव्हर; जाणून घ्या या सोप्या 8 स्टेप्स)

  Axis Bank - मार्चमध्ये अ‍ॅक्सिस बँकने अशी अनेक डिव्हाईस सुरू केली होती, जी आपल्या ग्राहकांना एनएफसीचा वापर करुन कॉन्टॅक्टलेस पेमेंटची परवानगी देतात. यात WristBand, Keychains आणि एक छोटंसं डिव्हाईस Loop देण्यात आलं होतं. हे सर्व डिव्हाईस ग्राहकांच्या बँक खात्याशी जोडलेले आहेत. सध्या एक युजर पिन न टाकता 5000 रुपयांपर्यंत NFC ट्रान्झेक्शन करू शकतो.

  (वाचा - तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी Google अकाऊंटमधून काढून टाका हे अ‍ॅप, अन्यथा...)

  या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी युजरला त्याचा पिन वापरुन पेमेंट प्रमाणित करण्याची आवश्यकता असेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Google, Online payments, Tech news

  पुढील बातम्या