Home /News /technology /

BigBasket ग्राहकांसाठी मोठी बातमी; 2 कोटी युजर्सचा डेटा लीक

BigBasket ग्राहकांसाठी मोठी बातमी; 2 कोटी युजर्सचा डेटा लीक

एका हॅकरने डार्क वेबवर बिगबास्केटचा हा डेटा 30 लाख रुपयांमध्ये विक्रीसाठी ठेवला आहे. डार्क वेबच्या नियमित तपासादरम्यान साइबलच्या टीमला हा डेटा 40,000 अमेरिकन डॉलरला विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे, असं दिसून आलं.

    नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : आजच्या धकाधकीच्या, फास्ट, सोशल मीडियाच्या जीवनात अनेकदा ऑनलाईन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. चैनीच्या वस्तूंबरोबरच आजकाल ग्राहक भाजी, किराणादेखील (grocery) ऑनलाईन खरेदी करतात. यासाठी बिगबास्केट (bigbasket) हे मोठं ऑनलाईन मार्केट आहे. परंतु बिगबास्केटच्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी आहे. या बिग बास्केट वापरकर्त्यांचा डेटा चोरीला जात असल्याचा अंदाज आहे. सायबर इंटेलिजन्स (cyber intelligence) कंपनी साबइलने (Cyble) दिलेल्या माहितीनुसार बिगबास्केटच्या 2 कोटी ग्राहकांचा डेटा चोरीला गेला आहे. या संदर्भात कंपनीने बेंगळुरूतील सायबर क्राईम विभागात गुन्ह्याची नोंद केली आहे. याविषयी Cybleने दिलेल्या माहितीनुसार, एका हॅकरने डार्क वेबवर बिगबास्केटचा हा डेटा 30 लाख रुपयांमध्ये विक्रीसाठी ठेवला आहे. डार्क वेबच्या नियमित तपासादरम्यान साइबलच्या टीमला हा डेटा 40,000 अमेरिकन डॉलरला विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे, असं दिसून आलं. एसक्यूएल फाइलची साईझ जवळपास 15 जीबी असून यामध्ये 2 कोटी ग्राहकांची माहिती आहे, असं कंपनीने सांगितलं आहे. ग्राहकांचं नाव, पत्ता आणि पासवर्ड लीक - या डेटामध्ये ग्राहकांची नावं, ई-मेल आईडी, पासवर्ड हॅशेज, मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, ठिकाण आणि आयपी अड्रेसचादेखील समावेश आहे. बिगबास्केट वन-टाइम पासवर्डचा वापर करते. जो प्रत्येकवेळी लॉगईन करताना बदलत असतो. Cybleने यामध्ये या पासवर्डचा उल्लेख केला आहे. (वाचा - PF खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम; अन्यथा भरावा लागेल टॅक्स) यासंदर्भात माहिती देताना बिगबास्केटने सांगितलं की, काही दिवसांपूर्वी आम्हाला या पद्धतीने डेटा चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. यासंदर्भात आम्ही माहिती घेण्याचा आणि तपास करण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत बेंगळुरू स्थित सायबर क्राईम विभागात गुन्ह्याची नोंद केली आहे. याआधी देखील अनेक कंपन्यांचा आणि त्यांच्या ग्राहकांचा डेटा चोरीला गेला आहे. बिगबास्केट ही चोरी झाली आहे का हे तपासून पुढचं पाउल उचलणार आहे. (वाचा - 100 रुपये बचतीतूनही करू शकता मोठी गुंतवणूक; चांगल्या रिटर्न्ससह सरकारी गॅरंटीही) बिगबास्केट कंपनी किराणा मालाचा, ऑनालइन वेबसाइटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुरवठा करते. त्यामुळे दरमहा किराणा या वेबसाइटवरून भरणारे अनेकजण आहेत. कंपनीने ग्राहकांची माहिती सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, ऑनलाइन व्यवहार करताना आपल्या कार्डाची माहिती सेव्ह न करता ती दरवेळी भरणं हा चांगला पर्याय आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Cyber crime

    पुढील बातम्या