मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Cyber Fraud: ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला सॉफ्टवेअर इंजिनियर, अनेकांना घातला लाखोंचा गंडा

Cyber Fraud: ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला सॉफ्टवेअर इंजिनियर, अनेकांना घातला लाखोंचा गंडा

आरोपी स्वत: सायबर एक्सपर्ट असल्याने आपल्याला कोणी पकडू शकत नाही, असा त्याला विश्वास होता. परंतु सायबर पोलिसांनी आरोपीचे सर्व नंबर सर्विलान्सवर ठेवले होते. काही दिवसांपूर्वी त्याने जेवण ऑर्डर केलं आणि पोलिसांना त्याच्या लोकेशनची माहिती मिळाली.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 7 जुलै: देशात एकीकडे डिजीटल व्यवहारात वाढ होत असताना दुसरीकडे ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राईमच्या (Cyber Crime) प्रकरणातही मोठी वाढ होत आहे. कोरोना काळात तर यात मोठी भर पडली आहे. फ्रॉडस्टर्स विविध मार्गांनी, पद्धतींनी लोकांनी फसवणूक करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार समोर आला असून, ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

इंदौरमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर मागील 5 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता. पोलिसांनी आरोपीचा नंबर सर्विलान्सवर टाकला होता. आरोपीने जसं ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं, त्याचं लोकेशन पोलिसांना मिळालं आणि नोएडातील एका अपार्टमेंटमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं. तो 50 हून अधिक सिम कार्डचा वापर करत होता.

2016 मध्ये उज्जैन सायबरमध्ये एका ऑनलाईन फ्रॉडची तक्रार आली होती. यात पीडित व्यक्तीने त्याला नोकरी देण्याच्या नावाखाली फसवण्यात आल्याची तक्रार केली होती. पोलीस सतत आरोपीला पकडण्यासाठी छापा टाकत होते. परंतु तो पोलिसांना चकवा देत होता. आरोपीने सर्वांना वेगवेगळी नावं सांगून अनेकांची फसवणूक केली आहे.

आरोपी स्वत: सायबर एक्सपर्ट असल्याने आपल्याला कोणी पकडू शकत नाही, असा त्याला विश्वास होता. परंतु सायबर पोलिसांनी आरोपीचे सर्व नंबर सर्विलान्सवर ठेवले होते. काही दिवसांपूर्वी त्याने जेवण ऑर्डर केलं आणि पोलिसांना त्याच्या लोकेशनची माहिती मिळाली.

आरोपी सॉफ्टवेअर इंजिनियर होता, त्यामुळे तो वेबसाईटमध्ये कधी नोकरीच्या नावाने, तर कधी सोशल मीडियावर मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होता. त्यांच्याशी प्रेमसंबंध निर्माण करुन त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करत होता आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत होता. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यात अनेक मुलींच्या नंबरवरुन मेसेज मिळाले आहे, त्या मेसेजमध्ये मुलींनी आरोपीला दिलेले पैसे परत मागितले आहेत. आरोपी फसवणुकीसाठी 50 हून अधिक नंबर्सचा वापर करत होता आणि फसवणूक करुन घेतलेले पैसे पार्टीत उडवत होता.

(वाचा - शिकार खुद शिकार हो गया! सोन्याची चेन चोरुन पळाला आणि...पाहा चोरीच्या घटनेचा अजब VIDEO)

पोलिसांनी त्याला ज्या घरातून ताब्यात घेतलं, त्या घरात एकही रुपया मिळाला नाही. त्याच्या 17 ते 18 बँक खात्यांची माहिती घेण्यात येत आहे. 9 पासबुक सायबर पोलिसांनी जप्त केली आहेत. त्याच्या सर्व बँक खात्यातील बॅलेन्सही शून्य आहे. आरोपीने त्याने हावर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतल्याचं सांगितलं, पोलीस यावरही तपास करत आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी होत असून पुढील तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Cyber crime, Online fraud, Tech news