मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Zomato ची नवी मोहिम, सर्व फूड डिलीव्हरी वाहनं होणार इलेक्ट्रिक

Zomato ची नवी मोहिम, सर्व फूड डिलीव्हरी वाहनं होणार इलेक्ट्रिक

Zomato ने 2030 पर्यंत आपल्या सर्व फूड डिलीव्हरी व्हिकल्स इलेक्ट्रिक व्हिकल्समध्ये कनव्हर्ट करणार असल्याचं सांगितलं आहे.

Zomato ने 2030 पर्यंत आपल्या सर्व फूड डिलीव्हरी व्हिकल्स इलेक्ट्रिक व्हिकल्समध्ये कनव्हर्ट करणार असल्याचं सांगितलं आहे.

Zomato ने 2030 पर्यंत आपल्या सर्व फूड डिलीव्हरी व्हिकल्स इलेक्ट्रिक व्हिकल्समध्ये कनव्हर्ट करणार असल्याचं सांगितलं आहे.

  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, 9 जून : ऑनलाईन फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोने (Zomato) 2030 पर्यंत आपल्या सर्व फूड डिलीव्हरी व्हिकल्स इलेक्ट्रिक व्हिकल्समध्ये कनव्हर्ट करणार असल्याचं सांगितलं आहे. 2030 पूर्वीच कंपनीमध्ये फूड डिलीव्हरी आणि इतर कामांसाठी वापरण्यात येणारी सर्व वाहनं इलेक्ट्रिक होणार आहेत. कंपनीचे को-फाउंडर दीपेंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू सारख्या शहरांत कंपनी आधीपासूनच Electric Vehicles चा वापर करत असल्याच सांगितलं. एका ब्लॉग पोस्टमध्ये झोमॅटोचे दीपेंदर गोयल यांनी सांगितलं, की कंपनी EV100 ग्लोबल इनिशिएटिव्ह जॉईन करेल, ही जागतिक स्तरावर कंपन्या आपल्या सर्व फ्लिट इलेक्ट्रिक व्हिकल्समध्ये स्विच करण्याची मोहिम आहे. या मोहिमेंतर्गत आमच्या 100 टक्के फ्लिट 2030 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक होतील.

(वाचा - आता घरबसल्या मिळवा Aadhaar द्वारे तुमचं लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स)

आमच्याकडे EVs सोर्स करण्यासाठी अनेक पार्टनर्स आहेत, असंही ते म्हणाले. वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) देखील EV100 ग्लोबल इनिशिएटिव्हचा एक भाग आहे. Flipkart नेही 2030 पर्यंत आपले सर्व व्हिकल्स इलेक्ट्रिकमध्ये ट्रान्सफॉर्म करण्याचं सांगितलं आहे.

(वाचा - राज्यात लवकरच नवी Electric Vehicle पॉलिसी; मुंबईसह या शहरांवर होणार परिणाम)

Zomato ने, Electric Vehicle सेक्टरमध्ये कंपनी अनेकांशी चर्चा करत असल्याचं सांगितलं. जेणेकरुन याचं पायलट डिझाईन करण्यासह बिजनेस मॉडेल क्रिएट केलं जाईल. ज्यामुळे फूड डिलीव्हरीसाठी वेगवान इलेक्ट्रिक मॉबिलिटी शक्य होईल. इलेक्ट्रिक वाहनांशिवाय Zomato यावर्षी आपला IPO लाँच करणार असून यासाठी कंपनीने SEBI कडे अर्जही केला आहे.
First published:

Tags: Electric vehicles, Zomato

पुढील बातम्या