सावधान! तुम्ही VIDEO बघत बसताय पण हॅकर्स साधतायत संधी

तुम्हालाही ऑनलाइन व्हिडिओ पाहण्याची सवय असेल तर सावध व्हा.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2019 08:47 AM IST

सावधान! तुम्ही VIDEO बघत बसताय पण हॅकर्स साधतायत संधी

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : इंटरनेट सहज उपलब्ध झाल्यानंतर ऑनलाईन व्हिडिओ, वेबसिरीज पाहण्याचं प्रमाण वाढलं आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात ऑनलाइन व्हिडिओ पाहण्याची क्रेझ आहे. यामुळे अनेक कंपन्या ऑनलाइन स्ट्रिमिंग सर्विस देत आहेत. नेटफ्लिक्सने यात मोठी मजल मारली आहे. इथं असलेल्या वेबसिरीजने युजर्सना वेड लावलं आहे. वेबसिरीज प्रदर्शित होताच ती न थांबता बघण्याचं वेड युजर्सना आहे. याशिवाय काहींना सतत व्हिडिओ पाहण्याची सवय आहे. पण ही सवय महागात पडू शकते.

सातत्याने व्हिडिओ पाहणाऱ्या युजर्सचा डेटा सुरक्षित नसल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाइन व्हिडिओ पाहत असताना जाहिराती येत असतात. आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्क्ष करतो. व्हिडिओ पाहतानादेखील एखादा पॉपअप आला तर ते आपण पाहत नाही. अशावेळी हॅकर्स संधी साधतात. स्ट्रिमिंग सर्विस वापरताना आपलं लक्ष स्क्रीनवर असतं. त्यावेळी जाहिरातीतून युजर्सचा इमेल अॅड्रेस, डिव्हाइसचा सिरियल नंबर गोळा केला जातो. याची माहिती टर फॉर डिजिटल डेमॉक्रसीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जेफ चेस्टर यांनी दिली.

वाचा : चिमूटभर मीठ आणि कपड्याच्या तुकड्याने उजळून निघेल अख्खं गाव, IIT चं संशोधन

मोबाइल किंवा लॅपटॉपला युजर्स त्यांची खासगी माहिती ठेवत असतात. हा डेटा त्यांना न कळत अशा ऑनलाइन स्ट्रिमिंगवेळी गोळा केला जाऊ शकतो. फेसबुक, गुगल, नेटफ्लिक्स यासारख्या कंपन्यांसोबत हा डेटा शेअर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अॅपल, एनबीसी युनिवर्सल, वॉल्ट डिजनी, वॉर्नर मीडिया या कंपन्या लवकरच कनेक्टेड टेलिव्हिजन आणि अमेझॉन, गुगलच्या डिव्हाइसवर स्ट्रिमिंग सर्विस सुरू करणार आहेत.

वाचा : नवी Advance Audi A6 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Loading...

सर्वाधिक वापरले जाणारे लोकप्रिय सर्च इंजिन गुगल आहे. इथं प्रत्येक गोष्टीची माहिती घेण्यासाठी युजर्स सर्च करत असतात. एका क्लिकवर सहज माहिती उपलब्ध होत असली तरी इथं फसवणुकीचे प्रकारही तितकेच आहेत. गुगलवरून एखादी साइट ओपन करताना काळजी घेतली नाही तर फटका बसू शकतो. ऑनलाइन शॉपिंग करताना त्याच्या डिटेल्स सेव्ह केलेल्या असतात. हा डेटा हॅकर्स वापरून फसवणूक करू शकतात.

तुम्हाला कोण ट्रॅक करतंय? नव्या अपडेटमुळे मिळणार रिपोर्ट

'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: technology
First Published: Oct 30, 2019 08:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...