लवकरच येणार onePlus चा 5G स्मार्टफोन, सोशल मीडियावर फोटो झाला लिक

चीनची प्रसिद्ध कंपनी लवकरच onePlus-7 लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी सध्या या 5G स्मार्टफोनवर काम करत असल्याचा फोटो ट्विटरवरून शेअर झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2018 03:37 PM IST

लवकरच येणार onePlus चा 5G स्मार्टफोन,  सोशल मीडियावर फोटो झाला लिक

मुंबई, 21 डिसेंबर : चीनमधील स्मार्टफोन निर्माण करणारी प्रसिद्ध कंपनी वनप्लसच्या सर्व फोनला आत्तापर्यंत मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. वनप्लस कंपनी लवकरच 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. येत्या जुन महिन्यापर्यंत हा नवा 5G फोन लाँच होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. परंतु या फोनचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर लिक झाला आहे. या फोटोमध्ये कंपनीचे कर्मचारी लाँच होणाऱ्या फोनबाबत माहिती देताना दिसत आहेत.

फोटोकडे बारकाईनं पाहिलं तर टेबलवर एक लाल रंगाचा फोन ठेवलेला दिसत आहे. आणि कंपनीचे सीईओ (CEO) पेटे लाऊ (Pete Lau) यांच्या हातामध्ये एक सँपल फोन आहे. वनप्लस कंपनीचा कर्मचारी फोनविषयी माहिती देत असल्याचं ट्विटमध्ये दिसत आहे.

वनप्लसचा येणारा 5G फोनला कंपनी onePlus-7 नावाने लाँच करण्याची शक्यता आहे. नुकताच मार्केटमध्ये आलेल्या onePlus-6T या स्मार्टफोनची सगळीकडे चर्चा होत आहे. त्याचबरोबर फोनला पसंती मिळत असल्याने कंपनीचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा नवा 5G फोन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

वनप्लसचा 5G स्मार्टफोन onePlus-6T या फोनपेक्षा वेगळा असेल. कंपनीने येणाऱ्या onePlus-7 फोनचे फिचर अजून लाँच केले नाही आहेत. पण कंपनीचे इतर स्मार्टफोनचे फिचर पाहिले तर येणारा onePlus-7 फोनसुद्धा दमदार असेल असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर या फोनच्या किंमतचीही अधिकृत घोषणा कंपनीने केलेली नाही. पण साधारण 40 हजारांपेक्ष जास्त फोनची किंमत असू शकते.


Loading...

येणाऱ्या नव्या फोनची माहिती ट्विटरवर ईशान अग्रवाल यांनी दिली आहे. त्यांनी वनप्लस कंपनीचा येणार 5G फोन कसा असणार आहे याबाबत त्यांनी सांगितलं आहे. सध्या फोन प्रोटोटाईप परिस्थितीमध्ये आहे. आणि या फोनचं फाईनल डिझाइन झाल्यावर स्मार्टफोनचा लुक थोडा वेगळा दिसेल. असे अग्रवाल यांनी सांगितले आहे. येत्या जुनमध्ये हा फोन लाँच करण्यात येईल अशी आशा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 01:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...