OnePlus चा धमाकेदार 7th Anniversary Sale; स्मार्टफोन, TV वर बंपर डिस्काउंट
OnePlus चा धमाकेदार 7th Anniversary Sale; स्मार्टफोन, TV वर बंपर डिस्काउंट
OnePlus ने ग्राहकांसाठी धमाकेदार '7th Anniversary Sale' आणला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना बंपर डिस्काउंट, ऑफर्स मिळणार आहेत. या सेलमध्ये इंस्टंट डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय आणि कॅशबॅकचाही फायदा मिळणार आहे.
नवी दिल्ली, 17 डिसेंबर : जर वनप्लस (OnePlus) स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर चांगली संधी आहे. OnePlus ने ग्राहकांसाठी धमाकेदार '7th Anniversary Sale' आणला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना बंपर डिस्काउंट, ऑफर्स मिळणार आहेत. या सेलमध्ये लेटेस्ट OnePlus 8 आणि OnePlus 8T मॉडेलवर जबरदस्त डिस्काउंट देण्यात आला आहे. त्याशिवाय सेलमध्ये इंस्टंट डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआयशिवाय कॅशबॅकचाही फायदा मिळणार आहे. 17 आणि 18 डिसेंबर रोजी या सेलचा फायदा घेता येणार आहे.
OnePlus 8 आणि 8T वर डिस्काउंट -
कंपनी OnePlus 8T स्मार्टफोनवर 2 हजार रुपयांची सूट देत आहे. तर OnePlus 8 वर 3 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. त्याशिवाय ऑडिओ डिवाईसवर HDFC बँकच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा डिस्काउंट मिळतो आहे.
HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड होल्डर्सला 4000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देते आहे. त्याशिवाय वनप्लस वाय सीरीजच्या 32 इंची आणि 43 इंची टीव्हीवरही 1000 रुपयांची सूट दिली जात आहे.
999 रुपयांत रेड केबल लाईफ -
कंपनी या सेलमध्ये ग्राहकांना वनप्लस रेड केबल लाईफ केवळ 999 रुपयात ऑफर करत आहे. केबलची 12 महिन्यांची वॉरंटी आहे. त्याशिवाय 12 महिन्यांसाठी 50GB क्लाउड स्टोरेज आणि 12 महिन्यांसाठी अॅमेझॉन प्राईमचं सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.