OnePlus 7 Pro : अपेक्षेपेक्षा स्वस्त असू शकतो हा नवा स्मार्ट फोन

भारतात OnePlus 7 Pro पुढच्या आठवड्यात लाँच होत आहे. लाँचिंगपूर्वी याची किंमत लीक झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 6, 2019 08:22 PM IST

OnePlus 7 Pro : अपेक्षेपेक्षा स्वस्त असू शकतो हा नवा स्मार्ट फोन

मुंबई, 6 मे : OnePlus 7 Pro हा OnePlus सीरिजचा पुढचा फोन लवकरच लाँच होतोय. भारतात हा फोन लाँच होईल 14 मे रोजी. OnePlus पहिल्यांदाच आपलं Pro व्हर्जन घेऊन येत आहे. याआधीचे वन प्लसचे सगळे फोन T या व्हेरिअंटचे होते. उदाहरणार्थ One Plus 5, One Plus 5T या फोनची बरीच चर्चा होती. अॅपलप्रमाणेच One Plus च्या किमतीची चर्चाही मोबाईल प्रेमींमध्ये नेहमी होत असते.

मोबाईलप्रेमींमध्ये उत्सुकता

आता One Plus चा Pro व्हेरिअंट लाँच होत असल्याने त्याची किंमत किती असेल याविषयी तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत. अपेक्षेपेक्षा कमी किंमतीत वन प्लसचा हा नवा फोन उपलब्ध होऊ शकतो, अशी शक्यता आहे.

काही नेटकऱ्यांनी विविध सूत्रांच्या हवाल्याने या फोनची किंमत लीक झाल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार, OnePlus 7 Pro च्या 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेज या व्हेरिअंटची किंमत 49,999 रुपये असू शकते, तर 8GB रॅम256GB स्टोरेज या व्हेरिअंटची किंमत 52999 रुपये असेल आणि 12GB रॅम 256GB स्टोरेज ची किंमत 57,999 रुपये असू शकेल.

कदाचित लाँच होईपर्यंत या किंमतीत बदल होऊ शकतो. कंपनीने अधिकृतपणे या फोनची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही.

Loading...

OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro हे दोन्ही स्मार्टफोन भारत, अमेरिका आणि युरोपमध्ये एकाच दिवशी म्हणजे 14 मे रोजी रात्री 8.15 वाजता लाँच होणार असल्याचं कंपनीने एका ट्विटद्वारे जाहीर केलं आहे. भारतात बेंगळुरू येथील एका एक्झिबिशन सेंटरमध्ये हा इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे.
कंपनीने काय सांगितली किंमत

कंपनीने या स्मार्टफोन्सच्या किमतींबाबत अद्याप कोणताच खुलासा केलेला नाही. मात्र, OnePlus 7 आणि 7 Pro हे दोन्ही फोन त्याच्या आधी लाँच झालेल्या OnePlus 6T पेक्षा महाग असतील, असं वनप्लस चे सीईओ Pete Lau यांनी म्हटलं आहे. त्यावरून या फोनची किंमत साधारण 50 हजाराच्या जवळपास असू शकते, अशी अटकळ आहे.

कंपनीने मोबाईल लाँचिंग संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये एक शॉर्ट लिंक देण्यात आली असून, त्यात इव्हेंटबाबत पूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसंच बेगळुरू येथे होणाऱ्या इव्हेंटमध्ये जर कुणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी 25 एप्रिलपासून तिकीट विक्री सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच कंपनीच्या अधिकृत YouTube Chanel वरसुद्धा हा प्रोग्राम तुम्ही पाहू शकाल असं सांगण्यात आलं आहे.

अशी आहेत फीचर्स

डिस्प्लेच्या बाबतीत बोलायचं झालं तर OnePlus 7 ला 6.4 इंचाचा FHD डिस्प्ले आणि OnePlus 7 Pro ला 6.7 इंचाचा QHD डिस्प्ले असणार आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमरा सेटअपसह मिळेल. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दूसरा कैमरा 8 मेगापिक्सल राहील. तर तिसरा कॅमेरा 16 मेगापिक्सलचा राहील. तर 4,000 mAh ची बॅटरी राहणार आहे.


VIDEO SPECIAL REPORT : काय आहे प्रिया बापटच्या KISS चा किस्सा!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...