OnePlus7 भारतात झाला लाँच; इथे पाहा First look आणि फीचर्स

OnePlus7 भारतात झाला लाँच; इथे पाहा First look आणि फीचर्स

गेले अनेक दिवस सोशल मीडिया आणि टेक जगात चर्चा असणारा OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro आज लाँच झाला. या फोनचा फर्स्ट लुक

  • Share this:

बेंगळुरू, 14 मे : गेले अनेक दिवस सोशल मीडिया आणि टेक जगात चर्चा असणारा OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. भारतासह अमेरिका आणि युरोपमध्ये एकाच दिवशी म्हणजे 14 मे रोजी रात्री 8.15 वाजता लाँच झाला. एका एक्झिबिशन सेंटरमध्ये हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.

OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro हे दोन्ही स्मार्टफोन 2 स्टोअरेज व्हेरियंटमध्ये असणार आहेत. पहिला 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजचा, तर दुसरा 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेजचा असणार आहे. हे फोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध राहणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

याशिवाय 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोअरेज असणारं OnePlus 7 Pro चं तिसरं व्हेरियंटसुद्धा या कार्यक्रमात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. OnePlus 7 आणि 7 Pro या दोन्ही फोनमध्ये लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असणार आहे.

अशी आहेत फीचर्स

डिस्प्लेच्या बाबतीत बोलायचं झालं तर OnePlus 7 ला 6.4 इंचाचा FHD डिस्प्ले आणि OnePlus 7 Pro ला 6.7 इंचाचा QHD डिस्प्ले असणार आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमरा सेटअपसह मिळेल. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दूसरा कैमरा 8 मेगापिक्सल राहील. तर तिसरा कॅमेरा 16 मेगापिक्सलचा राहील. तर 4,000 mAh ची बॅटरी राहणार आहे.

VIDEO फर्स्ट लुक इथे पाहा

First published: May 14, 2019, 10:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading