Oneplus 7 स्मार्टफोनचं बदललं डिझाईन, सोशल मीडियावर फोटो झाला लीक

Oneplus 7 स्मार्टफोनचं बदललं डिझाईन, सोशल मीडियावर फोटो झाला लीक

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला Oneplus 7 स्मार्टफोनचं डिझाईन बदललं आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी पॉपअप कॅमेरा देण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : वनप्लस कंपनीच्या नवीन स्मार्टफोनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर लीक झाला आहे. फोटो पाहता हा स्मार्टफोन OnePlus 7 असून कंपनीने फोनच्या डिझाईनमध्ये काही बदल केले आहेत. गेले अनेक दिवसांपासून OnePlus 7 स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा केली जात होती. अखेर त्या फोनचं डिझाईन आता समोर आलं आहे. लीक झालेल्या फोटोमध्ये Oneplus 7 सोबत Oneplus 6T स्मार्टफोनचा समावेश करण्यात आला आहे.

वनप्लसच्या नव्या स्मार्टफोनला थीन बेजल्स देण्यात आले आहेत. फोनच्या बाजूला असलेल्या चौकटीला बेजल्स म्हणतात. Oneplus 7 फोनमध्ये यावेळी नॉच देण्यात आलं नाही. वनप्लसच्या डिझाईनमध्ये हा सर्वात मोठा बदल आहे. त्यामुळे OnePlus 7 फोनमध्ये स्लाईडर असण्याची शक्यता आहे.

या व्यतिरिक्त OnePlus 6T फोनपेक्षा OnePlus 7 फोनचा स्पीकर मोठा आहे. सध्या फोटो पाहून स्मार्टफोनचा रिअर कॅमेऱ्याबद्दल अंदाज लावू शकत नाही. त्याचबरोबर OnePlus 7 फोनमध्ये सेल्फीसाठी फ्रंट कॅमेराही दिला नाही त्यामुळे या स्मार्टफोनमध्ये पॉप अप सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

OnePlus फोनमध्ये  स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेजर दिला आहे. कंपनीने OnePlus 6T फोनमध्ये Warp Charge 30 चार्जिंग टेक्नोलॉजीचा वापर केला होता म्हणून Oneplus 7 फोनमध्येही या नवीन टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. त्याचबरोबर OnePlus 7 हा स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग असण्याची शक्यता आहे असं अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

OnePlus 7 फोनची झलक काही दिवसांपूर्वी दाखवण्यात आली होती. OnePlus 7 स्मार्ठफोनचा एक कॉन्सेप्ट व्हिडिओ समोर आला होता. या कॉन्सेप्ट व्हिडिओला डिझाईनर वकार खान यांनी तयार केलं होतं. नुकताच लाँच झालेल्या Oneplus 6T फोनपेक्षा Onplus 7 फोनच्या डिझाईनमध्ये जास्त फरक नाही. पण वकारने यामध्ये दोन मोठे बदल केले आहेत.

डिझाईनमध्ये या फोनला तीन रिअर कॅमेरे दिले आहेत. टिअर ड्रॉप नॉच फोनमधून हटवण्यात आलं असून या व्यतिरिक्त सेल्फी कॅमेऱ्यासाठी फक्त एक पॉईंट होल देण्यात आलं आहे.

 

First published: January 14, 2019, 12:41 PM IST

ताज्या बातम्या