OnePlus 7 इथे मिळू शकतो मोफत; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप

OnePlus 7 इथे मिळू शकतो मोफत; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप

तुम्हाला फक्त अलेक्सा स्किल डाउनलोड करावं लागणार आहे आणि काही प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 जून : सध्या बाजारात स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनच्या किमती सुद्धा कमी करत आहेत. काही दिवसांपूर्वी ओप्पो, वीवो आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांनी त्यांच्या काही मॉडेल्सच्या किमती कमी केल्या होत्या. पण आता Amazon तुम्हाला अशी ऑफर देत आहे की ज्यामुळे तुम्ही OnePlus 7 मोबाइल फ्रीमध्ये मिळवू शकता. अमेझॉनची ही ऑफर अलेक्सा युजर्ससाठी आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त अलेक्सा स्किल डाउनलोड करावं लागणार आहे आणि काही प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत.

FACEBOOK ने पहिल्यांदाच केली भारतात गुंतवणूक, तरुणांच्या 'या' Startup ची चर्चा

वनप्लसने गुरुवारी भारतात अमेझॉन अलेक्सासाठी onePlus 7 सीरीजला डेडीकेटेड स्किल लॉन्च केलं आहे. OnePlus Alexa Skill च्या मदतीने युजर्सना त्यांच्या वनप्लस डिव्हाइसमधून कोणत्याही अमेझॉन स्मार्ट स्पीकर्स वापरून एका व्हॉइस कमांडच्या सेटशी बोलू शकतात. या स्पीकर्समध्ये Amazon Echo Plus, Echo Spot, Echo Dot आणि Amazon Echo Show यांचा सहभाग आहे.

ताशी 600 किमी वेगाने धावणार चीनची 'ही' ट्रेन

वनप्लस अलेक्सा स्किलला स्मार्ट स्पीकर्सच्या मदतीने अ‍ॅक्सेस करण्या व्यतिरिक्त युजर्स अलेक्सा अ‍ॅपशी सुद्धा कनेक्ट करू शकतात. हे अ‍ॅन्ड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोन्सवर उपलब्ध आहे. त्यामुळे नवा स्मार्टफोन जिंकण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप फॉलो कराव्या लागणार आहेत.

-अलेक्सा अ‍ॅपद्वारे वनप्लस स्किल अनेबल करा

-आता ‘अलेक्सा, ओपन वनप्लस’ प्रॉम्प्टसोबत वनप्लस स्किल ओपन करा

-यानंतर अलेक्सा तुम्हाला ‘स्टार्ट द क्विज’ असं सांगण्यासाठी प्रॉम्प्ट करेल.

वनप्लस अलेक्सा स्किल अनेबल झाल्यानंतर 30 जून पर्यंत तुम्हाला रोज तीन प्रश्न विचारले जाणार आहेत. यातील 7 प्रश्नांची तुम्ही बिनचूक उत्तरं दिली. तर तुम्हाला अनेक आकर्षक बक्षिसं मिळणार आहेत. यात स्मार्ट फोन आणि वनप्लस सीरिज जर्सीचा सहभाग आहे. या स्मार्टफोनची किंमत सध्या 32,999 रुपये आहे.

==============================================================

VIDEO : रुग्णालयात बाळाची काळजी घ्या, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद!

First published: June 14, 2019, 9:05 PM IST

ताज्या बातम्या