मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

एका चाकावरची इलेक्ट्रिक बाईक; सिंगल चार्जमध्ये 100km धावणार, पाहा किती आहे किंमत

एका चाकावरची इलेक्ट्रिक बाईक; सिंगल चार्जमध्ये 100km धावणार, पाहा किती आहे किंमत

चीनची प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाने इलेक्ट्रिक बाईक आणली असून ही बाईक केवळ एका चाकावरची आहे. एका सिंगल चार्जमध्ये ही बाईक 100 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 27 मार्च : ग्लोबल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता, कंपन्या आजकाल नवनवे मॉडेल्स बाजारात आणत आहेत. आता चीनची प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाने इलेक्ट्रिक बाईक आणली असून ही बाईक केवळ एका चाकावरची आहे. एका सिंगल चार्जमध्ये ही बाईक 100 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. याच्या बॅटरीचा चार्जिंग टाईम 3 ते 12 तास इतका असल्याचं सांगण्यात आलं आहे. इंटरनेटवर या बाईकचा फोटो पाहून यात स्टीलची trellis frame देण्यात आल्याचं दिसतंय. त्याशिवाय यात एक फ्यूल टँकही देण्यात आला आहे. हा फ्यूल टँक Ducati Monster डिझाइनपासून तयार करण्यात आला आहे. यात मागे, रियर सीट देण्यात आली आहे, परंतु ती किती प्रभावी असेल हे सांगता येणार नाही.

(वाचा - फोन पाण्यात पडल्यानंतर या गोष्टी करू नका; वॉटर डॅमेजपासून वाचण्यासाठी Magic Tips)

पॉवर आणि परफॉर्मेन्स - या बाईकमध्ये जी इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे, ती 2000W पॉवर जेनरेट करते. ही बाईक इतर बाईकच्या तुलनेत अतिशय हलकी असून, या बाईकचं वजन केवळ 40 किलोग्रॅम आहे. याचा टॉप स्पीड 48 kmph आहे आणि ही बाईक 60 ते 100 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते.

(वाचा - WhatsApp वापरकर्त्यांनी चुकूनही करू नका या सात चुका, अन्यथा खावी लागेल जेलची हवा)

किंमत - या बाईकची एक्स शो रुम किंमत भारतीय चलनानुसार, जवळपास 1.34 लाख रुपये इतकी आहे. अलीबाबाने इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये जबरदस्त मागणी पाहता, ही बाईक बाजारात आणली आहे.

(वाचा - ड्रायव्हिंग लायसन्स, RC बाबत मोठी घोषणा;आता या तारखेपर्यंत वैध राहणार डॉक्युमेंट)

दरम्यान, कंपनीने चीनच्या सरकारी ऑटो कंपनी SAIC सह पार्टनरशिपमध्ये इलेक्ट्रिक कार बनवण्याची घोषणा केली आहे. या कारची सर्वात मोठी बाब म्हणजे कारला वायरलेस चार्जिंग सिस्टम फीचर असेल असं सांगण्यात आलं आहे.
First published:

Tags: Electric vehicles

पुढील बातम्या