खुशखबर! 4000 रुपयांनी स्वस्त झाला One Plus चा फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

खुशखबर! 4000 रुपयांनी स्वस्त झाला One Plus चा फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

one plus नॉर्डच्या यशस्वी विक्रीनंतर कंपनीने आणखीन एका मोबाईलवर 4 हजार रुपयांची सूट दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : मोबाईल घेण्याचा विचार करत असला किंवा जुना मोबाईल खराब झाला म्हणून बदलायचा विचार असेल तर one plus कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणली आहे. भारतात वन प्लस 7 T प्रो मोबाईलच्या किंमत कंपनीने कमी केली आहे. हा मोबाईल तब्बल 4 हजार रुपये स्वस्त झाला आहे. हा मोबाईल आता ग्राहकांना 43 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

वन प्लस कंपनीने 4 हजार रुपये किंमत कमी केली असून त्यासोबत आणखीनही खास ऑफर्स ग्राहकांना दिल्या आहेत. अमेझॉनवरून हा फोन खरेदी केला तर ICICIच्या क्रेडिट कार्डवर खास ऑफर मिळणार आहे. तर EMI वर फोन घेतला तर 3000 रुपये डिस्काऊंट मिळणार आहे. इतकेच नाही तर फोनसह oneplus.in या वेबसाईटवरून फोन खरेदी केला तर ग्राहकांना मोबाईलसोबत फोनचं कव्हरही मिळणार आहे.

McLaren Editionमधील मोबाईलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. या फोनची साधारण किंमत 58,999 रुपयांपासून सुरू होत आहे.

हे वाचा-Disney Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं

OnePlus 7T Pro मोबाईलचे फीचर्स

वन प्लस 7T pro 6.67 इंच क्वाड HD1440x3120 पिक्सेल सूपर अॅम्युलेटेड डिस्प्ले मिळणार आहे. ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर मिळणार आहे. मल्टिटास्किंग सोबत 8GB रॅम मिळणार आहे.

48 मेगापिक्सेल कॅमेरा

कॅमेर्‍याविषयी सांगायचं झालं तर वनप्लस 7T प्रो मध्ये फोटो आणि व्हिडीयोसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. 48F 1.6 अॅपर्चर 8 आणि 16 मेगापिक्सेल कॅमेऱ्या मिळणार आहे. 16 अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा मिळणार आहे. वन प्लस कॅमेऱ्याचा विचार केला तर 16 मेगापिक्सेल सोनी IMX 471 कॅमेरा सेन्सर, सेल्फी कॅमेरा, फेस अनलॉक 4048 mAh बॅटरीसोबत 30 टी फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सपोर्टसह मिळणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 19, 2020, 11:37 AM IST
Tags:

ताज्या बातम्या