Home /News /technology /

नव्या वर्षात व्हा फिट! OnePlus Band मध्ये मिळणार 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप; किंमत फक्त...

नव्या वर्षात व्हा फिट! OnePlus Band मध्ये मिळणार 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप; किंमत फक्त...

One Plus कंपनीने बाजारात आतापर्यंत टीव्ही, मोबाईल आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणली आहेत. परंतु आता कंपनीने फिटनेस बँड (Fitness Band) देखील आणले असून शाओमीच्या एमआय बँड 5 (MI Band 5) ला हे टक्कर देणार आहे.

मुंबई, 05 डिसेंबर: जगभरातील प्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी OnePlus लवकरच बाजारात आपला फिटनेस बँड लाँच करणार आहे. नुकतेच कंपनीने याचा टिझर लाँच केला असून याचं नाव OnePlus Band असं आहे. कंपनीने बाजारात आतापर्यंत टीव्ही, मोबाईल आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणली आहेत. परंतु आता कंपनीने फिटनेस बँड (Fitness Band) देखील आणले असून शाओमीच्या एमआय बँड 5 (MI Band 5) ला हे टक्कर देणार आहे. लवकरच कंपनी भारतात हे फिटनेस बँड(Fitness Band) लाँच करणार असून आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून कंपनीने हा टीझर लाँच केला आहे. या टीझरमध्ये कंपनीने #SmartEverywear असा हॅशटॅग वापरला आहे. या व्हिडिओमध्ये कंपनीने क्रिप्टिक इमेज शेअर केली असून यामध्ये फ्रंट सॉफ्ट सिलिकॉन स्ट्रॅपवार (silicon trap) कंपनीचे नाव दिसणार आहे. याचबरोबर कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर प्रश्नमंजूषा स्पर्धा सुरु केली असून यामाधील विजेत्याला हे फिटनेस बँड जिंकण्याची संधी आहे. या फिटनेस बॅण्डमध्ये जबरदस्त बॅकअप असणारी बॅटरी मिळणार असून विविध प्रकारचे फीचर्स देखील आहेत.  हे फिचर मिळणार या फिटनेस बॅण्डमधे ग्राहकांना  24/7 हार्ट रेट + Sp02 ब्लड सॅच्युरेशन मॉनिटरिंग सिस्टम बरोबरच स्लिप ट्रॅकिंग फिचर देखील मिळणार आहे. वनप्लस बँडमध्ये 1.1 इंचाचा टच AMOLED डिस्प्ले मिळणार असून 14 दिवसांचा जबरदस्त बॅटरी बॅकअप देखील मिळणार आहे. त्याचबरोबर या बॅण्डमध्ये 13 व्यायाम प्रकारांचं मॉनिटरिंग केलं जाणार आहे. म्हणजे चालणं, धावणं, पायऱ्या चढणं अशा व्यायामांमुळे आपण शरीरातील किती कॅलरी बर्न झाल्या हे आपल्याला हा बँड दाखवेल. या डिव्हाइसमधे IP68 टेक्नोलॉजी वापरली जाणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी यासंबंधी टिप्सटर मुकुल शर्मा याने याचा टिझर आणि इमेज शेअर केली होती. त्याचबरोबर टिप्सटर ईशान अग्रवाल याने याची ट्विटरवर माहिती देताना फीचर्स देखील सांगितले होते. त्याचबरोबर भारतात 11 जानेवारीला हे बँड लाँच होणार असल्याची माहिती देखील त्याने आपल्या ट्विटमधे दिली होती. या बँडची किंमत अतिशय स्वस्त ठेवण्यात आली असून अवघ्या 2,499 रुपयांत हे फिटनेस बँड (Fitness Band) खरेदी करता येणार आहे. त्यामुळे आता बाजारात आल्यानंतर कोणत्या फिटनेस बँडबरोबर याची स्पर्धा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:

Tags: Technology

पुढील बातम्या