Home /News /technology /

जबरदस्त कॅमेरा, सुपर बॅटरी लाईफ असलेला OnePlus 8T 5G येतोय; काय असेल किंमत?

जबरदस्त कॅमेरा, सुपर बॅटरी लाईफ असलेला OnePlus 8T 5G येतोय; काय असेल किंमत?

वनप्लस (One Plus) ही कंपनी OnePlus 8T 5G हा त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. या फोनमध्ये जबरदस्त बॅटरी बॅक आणि सुपर कॅमेरा देण्यात आला आहे.

    मुंबई, 13 ऑक्टोबर: स्मार्ट फोन कंपन्यांमध्ये वनप्लस ब्रँड आघाडीवर आहे. वनप्लस (One Plus) ही कंपनी OnePlus 8T 5G हा त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. OnePlus 8T 5G हा OnePlus 8 5G पेक्षा असे 2 स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहेत. OnePlus 8T 5Gची वैशिष्ट्ये काय? OnePlus 8T 5G हा स्मार्टफोन 6.55 इंच लांबीचा असणार आहे. या फोनमध्ये 120Hz AMOLED प्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे याचा ब्राइटनेस 1,100 Nits आहे. 4,500 mAh बॅटरीसह 65 वॅटचा फास्ट चार्जर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजनची 11 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. OnePlus 8T 5G मध्ये क्वालकॉमस्नॅपडॅगन 865+ प्रोसेसर बसवण्यात आला आहे. वन प्लच्या या फोनमध्ये 2 व्हेरीअंट देण्यात आली आहेत. त्यापैकी 8जीबी + 128 जीबी आणि 12 जीबी + 256 जीबीमध्ये उपलब्ध आहे. फोनची किंमत अंदाजे 60,000 रुपये असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीने OnePlus 8T मध्ये 4 कॅमेरा सेंसरसह LED फ्लॅश दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 48MP कॅमेरा, 16MP अल्ट्रा वाईल्ड लेन्स, 5MP मॅक्रो कॅमेरा, 2MP डेप्थ सेंसर आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. कधी होणार लाँच? OnePlus 8T 5G च्या लाँचमध्ये सर्वांना सहभागी होता यावं म्हणून कंपनीने वनप्लस वर्ल्ड हा व्हर्च्युअल रिअलिटी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. वन प्लस कम्युनिटीतील सर्व ग्राहकांना यात सहभागी होता येणार आहे. तसेच कम्युनिटीच्या सर्व सदस्यांना लाँचच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.OnePlus 8T 5G हा बुधवारी 14 ऑक्टोबरला भारतीय वेळेनुसार रात्री 7:30 वाजता लाँच होणार आहे. तुम्ही हा कार्यक्रम वनप्लसच्या युटुब चॅनलवर लाईव्ह बघू शकता. आजच बुक करा OnePlus 8T 5G OnePlus 8T ची प्रीबुक सुविधा 25 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. 16 ऑक्टोबरपर्यंत वन‌प्लसच्या सर्व स्टोअरमध्ये चालू राहणार आहे. फक्त 2000 रुपये भरून तुम्हाला तुमचा फोन आधीच बुक करून ठेवता येणार आहे. प्री बुकिंग केलेल्या ग्राहकांनी सर्वात आधी प्राधान्य देण्यात येईल. वनप्लस कंपनीचे स्मार्ट फोन्स लाँचनंतर काही तासातच विकले जातात. त्यामुळे ग्राहकांसाठी प्रीबुकिंगची सुविधा देण्यात आली आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Smart phone

    पुढील बातम्या