Video : One plus 6T फोन घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा!

Video : One plus 6T फोन घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा!

नवीन फोन घेणाऱ्यांसाठी खुशखबर... One plus कंपनीकडून नव्या One plus 6T फोनची घोषणा करण्यात आली आहे. हा फोन काही नव्या फीचर्ससह नव्या रंगात बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : बाजारात नवीन फोन आला की तो विकत घ्यायलाच पाहिजे असं काही लोकांचं असतं. बाजारात One plus कंपनीच्या फोनची मागणी वाढत आहे. गेल्या महिन्यात 30 ऑक्टोबरला One plus 6T फोन लाँच करण्यात आला. जर तुम्ही हा One plus 6T फोन घेण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पाहा. कारण या फोनमध्ये काही नवीन फिचर्स देण्यात येणार आहेत.

कंपनीने लाँच केलेल्या One plus 6T फोनमध्ये काही बदल करण्यात आला आहे. One plus 6T फोन नव्या स्वरुपात लाँच करणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. फोनच्या लाँचबाबत कंपनीकडून 12 नोव्हेंबरला ट्विटरव्दारे व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

15 नोव्हेंबरपासून हा फोन बाजारपेठेत उपलब्ध असून. One plus  कंपनीने ब्लॅक कलरमध्ये हा फोन लाँच केला आहे. One plus 6T या फोनचे दोन वेगवेगळे कलर पॅटर्न असणार आहेत.

नव्या आलेल्या One plus फोन पहिल्यांदा चीनमध्ये लाँच केलं गेलं. चीनमध्ये लाँच केलेल्या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB मेमरी आहे.One plus 6-T या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे फिंगर लॉक सिस्टीम आहे. त्याचबरोबर बॅटरी बॅकअप अतिशय उत्तम आहे. सध्या या फोनला पसंती मिळाल्यानं मागणीत वाढ झाली आहे. 37,999 रुपयांना हा फोन तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल. येत्या 15 नोव्हेंबरला भारतात हा फोन लाँच होणार आहे.

First published: November 13, 2018, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading