मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Diwali 2020: या कंपन्यांच्या कारवर बंपर ऑफर्स; 2.5 लाखांपर्यंतची भरघोस सूट

Diwali 2020: या कंपन्यांच्या कारवर बंपर ऑफर्स; 2.5 लाखांपर्यंतची भरघोस सूट

काही कार कंपन्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठा डिस्काउंट आणि ऑफर्स दिल्या आहेत. जाणून घ्या अशाच काही ऑफर्सबद्दल.

काही कार कंपन्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठा डिस्काउंट आणि ऑफर्स दिल्या आहेत. जाणून घ्या अशाच काही ऑफर्सबद्दल.

काही कार कंपन्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठा डिस्काउंट आणि ऑफर्स दिल्या आहेत. जाणून घ्या अशाच काही ऑफर्सबद्दल.

  • Published by:  Karishma Bhurke

मुंबई, 13 नोव्हेंबर : सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेक डिस्काउंट ऑफर सुरु असतात. दिवाळीच्या फेस्टिव्ह सीजनमध्ये (Festive Season) मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आणि ऑफर्स मिळत असल्याने अनेक ग्राहकही खरेदी करतात. काही कार कंपन्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठा डिस्काउंट आणि ऑफर्स दिल्या आहेत. जाणून घ्या अशाच काही ऑफर्सबद्दल.

मारुती सुझुकीच्या गाड्यांवर ऑफर -

मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांसाठी विविध गाड्यांवर ऑफर्स दिल्या आहेत. कंपनी कोरोनाच्या काळातील तूट भरून काढण्यासाठी Ciaz आणि Dzire या गाड्यांवर डिस्काउंट देत आहे. Ciaz वर कंपनी मेट्रो शहरांमध्ये 60 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. तर Dzire 2020

मॉडेलवर 42 हजारांची सूट मिळतेय. त्याचबरोबर Dzire च्या जुन्या मॉडेलवर 57 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.

(वाचा - प्रदूषण कमी करण्यासाठी या 6 कंपन्यांच्या भारतातील जबरदस्त इलेक्ट्रिक कार)

होंडाच्या या गाड्यांवर आकर्षक सूट -

जपानच्या कार उत्पादक कंपनी होंडानेही आपल्या सर्व मॉडेलवर मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. Amaze च्या पेट्रोल मॉडेलवर 47 हजार रुपयांपर्यंत, तर डिझेल मॉडेलवर 30 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. त्याचबरोबर जुन्या गाड्यांच्या एक्स्चेंजवर 15 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. चार ते पाच वर्षांसाठी इन्श्युरन्स बोनस पॅकेज 12 हजार रुपयांना उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेल मॉडेलवर 10 ते 20 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंटदेखील मिळणार आहे.

पाचव्या जनरेशनच्या होंडा सिटी गाडीवर 30 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज आणि रॉयल्टी बोनस मिळणार आहे. या नवीन सेडान गाडीवर, एक्स्चेंज स्कीमवर 30 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देखील मिळणार आहे. तसंच होंडाची प्रिमिअम सेडान कार सिव्हिकच्या डिझेल मॉडेलवर देखील 2.5 लाख रुपयांचा रोख डिस्काउंट मिळत आहे. तर पेट्रोलच्या मॉडेलवर 1 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे.

(वाचा - जुनी द्या अन् नवी गाडी घ्या, सरकारकडून स्पेशल सूट, जाणून घ्या काय आहे प्लान)

Volkswagen वर 60 हजारांचा डिस्काउंट -

Volkswagen च्या वेंटो गाडीवर मोठा डिस्काउंट आहे. या गाडीवर सणासुदीच्या दिवसांत 60 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

टाटा मोटर्सच्या या गाड्यांवर 30 हजारपर्यंतचा डिस्काउंट -

BS-VI इंजिनसह बाजारात आलेली टाटाची टिगोर ही कंपनीची एकमेव सेडान गाडी आहे. या गाडीवर 30 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये वेगवेगळ्या ऑफर्स आहेत.

First published: