नवी दिल्ली, 28 एप्रिल : समजा तुम्ही तुमच्या जीमेलचा (Gmail)पासवर्ड (Password) विसरला आहात, तर तुम्ही तो आठवण्याचा प्रयत्न करून पुन्हा लॉग इन (Login) करण्याचा प्रयत्न करता किंवा तरीही नाहीच आठवला तर ‘फरगॉट पासवर्ड’(Forgot Password)हा पर्याय वापरून पुन्हा पासवर्ड रिसेट करण्याचा प्रयत्न करता. केवळ जीमेलच नाहीतर बहुतेक सर्व प्रकारच्या डिजिटल लॉग-इनचा पासवर्ड विसरल्यास हीच प्रक्रिया केली जाते. आपल्या गुगल अकाउंटचा पासवर्ड विसरला, तर कोणी थेट गुगलचे (Google) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांच्याकडे जात नाही नां? पण एक व्यक्ती अशी आहे जिनं आपल्या गुगल अकाउंटबाबत अडचण उद्भवल्यावर थेट सुंदर पिचाई यांच्याकडेच मदत मागितली आहे. सुंदर पिचाई यांनी भारताला मदतीसाठीच्या केलेल्या ट्विटवरच या व्यक्तीने मदत मागितली आहे.
भारतात (India) सध्या कोरोना साथीची परिस्थिती अत्यंत भीषण झाली असून, ऑक्सिजन तुटवड्याच्या (Oxygen Shortage) संकटानं देशभरात दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गुगलचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी मदतीचा हात पुढे केला असून, गुगल आणि त्यांची टीम भारताला 135 कोटींची आर्थिक मदत करणार असल्याचं त्यांनी सोमवारी जाहीर केलं. पिचाई यांनी ट्विट (Tweet) करून ही मदत जाहीर केली. ही आर्थिक मदत युनिसेफ आणि गिव्ह इंडियामार्फत दिली जात असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
या ट्विटवर उत्तर देत मदन (@ Madhan67966174) नावाच्या एका ट्विटर युजरनं पिचाई यांच्याकडे चक्क पासवर्ड बाबत मदत मागितली आहे. ‘नमस्कार सर, कसे आहात? मला जीमेल आयडी पासवर्डसाठी मदतीची आवश्यकता आहे. पासवर्ड रीसेट कसा करायचा हे मी विसरलो आहे. कृपया मदत करा.’ असं त्यानं म्हटलं आहे.
त्याच्या या ट्विटवर इतर ट्विटर (Twitter) युजर्सनी उत्तर द्यायला सुरुवात केली असून, अनेक मजेदार प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.
Hello sir How are you I need one help in my gmail id password I forgeted how to reset the password please help me
— Madhan (@Madhan67966174) April 26, 2021
दरम्यान, जगातील अनेक देशांनीही भारताला मदत करण्याचा निर्णय घेतलाअसून, ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देश मदतीसाठी पुढे आले आहेत. मंगळवारी भारताला ब्रिटनमधून व्हेंटिलेटरसह अनेक वैद्यकीय उपकरणं मिळाली. त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनीही मदतीचं आश्वासन दिलं असून, या संदर्भात त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चाही केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.