Home /News /technology /

स्क्रीनमध्येच लपलेला असेल कॅमेरा; येतोय जगातला पहिला 4G ऑन-स्क्रीन कॅमेरा स्मार्टफोन

स्क्रीनमध्येच लपलेला असेल कॅमेरा; येतोय जगातला पहिला 4G ऑन-स्क्रीन कॅमेरा स्मार्टफोन

या फोनचा कॅमेरा खास असून याचा फ्रन्ट कॅमेरा, याच्या स्क्रीनमध्येच असणार आहे. फ्रन्ट कॅमेरासह, साउंड यूनिटही स्क्रीनखाली असेल. आता कंपनी लवकरच या फोनचं 4G वर्जन आणणार असल्याची चर्चा आहे.

  नवी दिल्ली, 1 जानेवारी : नवीन वर्षात नवा, अनोखा स्मार्टफोन येणार असल्याची चर्चा आहे. या फोनचा कॅमेरा खास असून याचा फ्रन्ट कॅमेरा, याच्या स्क्रीनमध्येच असणार आहे. फोनमध्ये ऑन-स्क्रीन कॅमेरा टेक्नोलॉजीचा (अंडर-डिस्प्ले कॅमरा टेक्नोलॉजी) वापर करण्यात येणार आहे. हा जबरदस्त स्मार्टफोन ZTE कंपनीचा आहे. ZTE जगातील पहिली कंपनी आहे, ज्यांनी या टेक्नोलॉजीचा कमर्शियल वापर करून मोठ्या संख्येत मोबाईल प्रोडक्शन केलं आहे. कंपनीने आपल्या ZTE Axon 20 5G स्मार्टफोनमध्ये या टेक्नोलॉजीचा वापर केला आहे आणि आता कंपनी लवकरच या फोनचं 4G वर्जन आणणार असल्याची चर्चा आहे. रिपोर्टनुसार, ZTE Axon 20 4G स्मार्टफोन 8-कोर 4G प्लॅटफॉर्मसह येणार आहे. या फोनमध्ये Huben T618 प्रोसेसर असू शकतो. ZTE Axon 20 4G स्मार्टफोनमध्ये फ्रन्ट कॅमेरा आणि साउंड यूनिट स्क्रीनखाली असेल. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह हा फोन बाजारात येऊ शकतो. या फोनच्या लाँचबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

  (वाचा - वोडाफोन-आयडियाला मोठा धक्का! भारतात याठिकाणी बंद करणार 3G सेवा)

  काय असतील फीचर्स - - 6.92 इंची OLED स्क्रीन - 4,220 mAh बॅटरी - 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट - Android 10 बेस्ड MiFlavor 10.5 - इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर

  (वाचा - 108MP कॅमेरासह Xiaomi Mi 10i भारतात लवकरच लाँच होणार; जाणून घ्या फीचर्स)

  फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. फोनला चार कॅमेरा असून त्यापैकी 64 मेगापिक्सल AI मेन कॅमेरा असेल. त्याशिवाय 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सल डेप्थ लेन्स, 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स असेल. फोनमध्ये सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा असेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Smartphone

  पुढील बातम्या