मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

रस्त्यात गाडी खराब झाली तर घाबरू नका, तुमच्या मदतीला आहेत या स्टार्टअप कंपन्या

रस्त्यात गाडी खराब झाली तर घाबरू नका, तुमच्या मदतीला आहेत या स्टार्टअप कंपन्या

सुरक्षित आणि मजेदार प्रवासादरम्यान रस्त्यातच इंधन संपले म्हणून तुम्ही अडकून बसलात तर हे 5 स्टार्टअप्स (Startups) तुम्हाला इंधन वितरणासाठी (Fuel Distribution) मदत करु शकतात.

सुरक्षित आणि मजेदार प्रवासादरम्यान रस्त्यातच इंधन संपले म्हणून तुम्ही अडकून बसलात तर हे 5 स्टार्टअप्स (Startups) तुम्हाला इंधन वितरणासाठी (Fuel Distribution) मदत करु शकतात.

सुरक्षित आणि मजेदार प्रवासादरम्यान रस्त्यातच इंधन संपले म्हणून तुम्ही अडकून बसलात तर हे 5 स्टार्टअप्स (Startups) तुम्हाला इंधन वितरणासाठी (Fuel Distribution) मदत करु शकतात.

मुंबई, 3 जून : अशी कल्पना करा, खूप दिवसांनी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत सहलीला चालला आहात. तुम्ही आणि तुमचे नातेवाईक अत्यंत उत्साही आहात आणि प्रवासाचा आनंद घेत आहात. अशातच अचानक तुमच्या कारमधील इंधन रस्त्यातच संपलं, तुमच्या मार्गावर किंवा आसपास मदतीसाठी कोणीही नाही, अशा वेळी तुम्ही काय कराल? अशा वेळी विचार करा की अगदी सोप्या स्टेप्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत इंधन पोहोचवणारे एखादे मोबाईल अॅप (Mobile App) असेल तर? होय, अशा मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून तुम्ही एका क्लिकवर इंधन वितरणासह सर्व आवश्यक सहाय्य प्राप्त करु शकता. सुरक्षित आणि मजेदार प्रवासादरम्यान रस्त्यातच इंधन संपले म्हणून तुम्ही अडकून बसलात तर हे 5 स्टार्टअप्स (Startups) तुम्हाला इंधन वितरणासाठी (Fuel Distribution) मदत करु शकतात. जाणून घेऊया या स्टार्टअप्स विषयी...

रेडी असिस्ट (Ready Assist)

रेडी असिस्ट हे अगदी अलिकडचे असले तरी देशात सर्वदूर आणि कानाकोपऱ्यातही त्यांचे कव्हरेज मिळते. या स्टार्टअपमार्फत आपत्कालीन इंधन वितरण, बॅटरी जंपस्टार्ट, पंक्चर रिपेअर्स आणि टोईंग सुविधा दिली जाते. संपूर्ण भारतामध्ये त्यांची उपलब्धता ही जवळपास 100 टक्के आहे. या स्टार्टअप मधील कर्मचारी अत्यंत तातडीने गरजूंपर्यंत पोहचतात. त्यांच्याकडे 24x7 हॉटलाईन, बहुभाषिक सपोर्ट (Multi Language Support) तसेच व्हॉटसअप सपोर्टही (Whatsapp Support) उपलब्ध आहे. या कंपनीचे कर्मचारी गरजू ग्राहकांपर्यंत संपर्कानंतर केवळ 30 मिनिटात पोहोचतात.

पीप फ्युएल्स (Pep Fuels)

पीप फ्युएल्स हा मागणीनुसार ग्राहकांना डिझेल, पेट्रोल आणि इंजिन ऑईल पुरवठा करणारा फ्युएल डिलिव्हरी स्टार्टअप (Fuel Delivery Startup) आहे. पेट्रोलियम उत्पादनांचे घरपोच वितरण करणारा हा पहिला शासनमान्य प्लॅटफॉर्म आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या ऍप आधारित सेवेसाठी त्यांनी इंडियन ऑईलसोबत त्रिपक्षीय करार देखील केला आहे. ही कंपनी इंधन वितरणासाठी इंधनाच्या मूळ किंमतीवर केवळ 1 रुपया प्रतिलीटर असा चार्ज आकारते. या कंपनीचा दैनंदिन वितरण कालावधी सध्या सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आहे.

फ्युएल बडी (Fuel Buddy)

फ्युएल बडी हा ऍपवर आधारित आणि आयओटी, क्लाऊड इनेबल इंधन वितरण सेवा देतो. पेट्रोल पंपावर इंधनाचे जे दर आहेत, त्या दरात ही कंपनी तुम्हाला घरपोच किंवा तुमच्या लोकेशनवर येत इंधन वितरित करते. ही कंपनी तांत्रिक एकत्रिकरणासाठी आणि पूर्णपणे स्वयंचलित पुरवठा श्रृंखलेसाठी एपीआय सुविधा पुरवते. हे ऍप दर्जेदार इंधन खरेदी आणि अगदी शेवटच्या ग्राहकाला घरपोच इंधन वितरित करण्यासाठी आयओसीएल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या 3 मोठ्या इंधन वितरण करणाऱ्या कंपन्यासोबत काम करते.

आयसेफ असिस्ट (iSafe Assist)

आयसेफ असिस्ट ही रस्त्यावरील गरजू प्रवाशांना वेगात मदत करणारी, वाहनचालकांना दुरुस्ती सेवा देणारी आणि रस्ते तसेच वाहनांची सुरक्षितता जपणारी कंपनी आहे. या व्यतिरिक्त आयसेफ असिस्ट रस्त्यांवरील वाहनांची दुरुस्ती, टोईंग सेवा, रुग्णवाहिका सेवा, आपत्कालीन कॅब सेवा, इंधन वितरण आणि फ्लॅट टायर सुविधा पुरवते. आयसेफ असिस्ट दुचाकी वाहने, कार, लहान आणि मोठ्या व्यावसायिक वाहनांसाठी पॅकेजेसच्या माध्यमातून ऑन-कॉल (On-call) सेवा देते.

रोडा ऑन रोड असिस्टन्स (Roda On Road Assistance)

रोडा ऑन रोड असिस्टन्स ही 24x7 आपत्कालीन रोडसाईड सुविधा पुरवते. देशातील सर्व भागात ही कंपनी ब्रेकडाऊन, रोडसाईज असिस्टन्स, वाहनांतील लहान-मोठया बिघाडांची जागेवर दुरुस्ती करणे आदी सेवा देते. गरजूंना कुठेही प्रत्यक्ष किमतीनुसार 5 लीटर पर्यंत पेट्रोल आणि डिझेल वितरित केले जाते. जर तुम्ही शहरातील प्रचंड गर्दीत किंवा एखाद्या निर्जन मार्गावर वाहन नादुरुस्त झाले म्हणून अडकला असाल तर रोडा ऑन रोड असिस्टन्स तुमच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असते. वाहन नादुरुस्त झाल्याने त्रस्त असलेल्या वाहन चालकापर्यंत कॉल मिळताच केवळ 30 मिनिटात या कंपनीचे कर्मचारी जाऊन पोहोचतात.

First published:

Tags: Bike riding, Car, Mobile app