मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय Apple MacBook Pro; आयफोनवरही 6 हजारांची सूट

आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय Apple MacBook Pro; आयफोनवरही 6 हजारांची सूट

अ‍ॅपल मॅकबुक (Apple Macbook) आता त्याच्या किंमतीहून अतिशय स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. भारतात मॅकबुकची किंमत कमी झाली आहे.

अ‍ॅपल मॅकबुक (Apple Macbook) आता त्याच्या किंमतीहून अतिशय स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. भारतात मॅकबुकची किंमत कमी झाली आहे.

अ‍ॅपल मॅकबुक (Apple Macbook) आता त्याच्या किंमतीहून अतिशय स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. भारतात मॅकबुकची किंमत कमी झाली आहे.

    नवी दिल्ली, 18 मार्च : अ‍ॅपल मॅकबुक (Apple Macbook) आता त्याच्या किंमतीहून अतिशय स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. भारतात मॅकबुकची किंमत कमी झाली आहे. इंटेल-आय5 (intel i5) ही चिप असलेल्या मॅकबुक प्रोच्या (13 इंच) किमतीत तब्बल 18 हजारांनी घट झाली आहे. मॅकबुक प्रो (Macbook Pro) सध्या 99 हजार 990 रुपयांना अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. 256 GB SSD च्या मॉडेलवर ही सवलत देण्यात आली आहे.

    चिप्ससाठी इंटेल कंपनीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी अ‍ॅपल (Apple) कंपनीने गेल्या वर्षीपासून इंटेलऐवजी M1 या स्वतःच बनवलेल्या चिप्स वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे इंटेल चिप्स असलेल्या मॅकबुक प्रोवर एवढी सवलत देण्यात आली असावी. कारण या एकमेव मॉडेलच्या किमतीत इतकी मोठी घट करण्यात आली आहे. तसंच, अ‍ॅमेझॉनवर याच्या 256 जीबी मॉडेलवर 18 हजार रुपयांची एक्स्चेंज ऑफरही देण्यात आली आहे.

    मॅकबुक प्रोचं 512 जीबी स्टोरेज मॉडेल अ‍ॅमेझॉनवर 1 लाख 41 हजार 719 रुपयांत उपलब्ध आहे. त्या मॉडेलवर 1200 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे.

    (वाचा - Covid-19 Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन; बुक करा स्लॉट)

    M1 ही इन-हाउस चिप असलेलं मॅकबुक प्रोचं (13 इंच) 512 जीबी स्टोरेजचं मॉडेल 1 लाख 42 हजार 900 रुपये आणि 256 जीबी स्टोरेजचं मॉडेल 1 लाख 22 हजार 900 रुपयांना अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध करण्यात आलं आहे. M1 चिप असलेल्या मॅकबुक एअरची (Macbook Air) किंमत 92 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे.

    (वाचा - Jio, Airtel, Viच्या या स्वस्त प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime सबस्क्रिप्शन फ्री)

    अ‍ॅमेझॉनवर (Amazon) सध्या अ‍ॅपल डेज (Apple Days) हा सेल सुरू असून, 17 मार्च हा त्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामध्ये ग्राहकांना मॅकबुक, आयफोन, आयपॅड अशा प्रॉडक्ट्सवर सवलत देण्यात येत आहे.

    अ‍ॅपल डेजमध्ये HDFC बँकेचं कार्ड वापरणाऱ्यांना आयफोन 12 मिनी या मॉडेलवर 8000 रुपयांपर्यंतची सूट आणि त्यासारख्या आणखीही काही ऑफर्स मिळत आहेत. या सेलमध्ये लेटेस्ट आयफोन 12 सीरिज, आयफोन 11 सीरिज आणि अ‍ॅपलच्या अन्य प्रॉडक्ट्सवरही उत्तम ऑफर्स आहेत. मॅकबुकच्या किमतीत घट होणं हा अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपल डेज या सेलचाच भाग आहे, असं मानलं जात आहे.

    आयफोन किंवा अ‍ॅपलचे प्रॉडक्ट्स ज्यांना खरेदी करायचे आहेत, त्यांच्यासाठी या सेलचा चांगला फायदा होऊ शकतो. तसंच या सेलचे अजूनही काही तास शिल्लक असल्यामुळे अजूनही ज्यांनी संधी घेतली नसेल, त्यांना संधीचा फायदा घेता येऊ शकतो.

    First published:

    Tags: Apple, Iphone