ATM ट्रान्झेक्शनआधी कॅन्सल बटण दोन वेळा दाबल्यामुळे पिन चोरी होत नाही? वाचा काय आहे सत्य

'कार्ड एटीएममध्ये टाकण्याआधी दोन वेळा कॅन्सल बटण प्रेस करावं. यामुळे तुमचा पिन चोरी होणार नाही, RBI कडून या सूचना देण्यात आल्या आहेत', असा दावा व्हायरल फेक मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

'कार्ड एटीएममध्ये टाकण्याआधी दोन वेळा कॅन्सल बटण प्रेस करावं. यामुळे तुमचा पिन चोरी होणार नाही, RBI कडून या सूचना देण्यात आल्या आहेत', असा दावा व्हायरल फेक मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 जून : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत असतात. आता नवा मेसेज व्हायरल झाला असून या मेसेजमध्ये ATM PIN बाबत एक दावा केला जात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पिन चोरीपासून वाचण्यासाठी ATM ट्रान्झेक्शनआधी दोन वेळा कॅन्सल बटण प्रेस करण्याबाबत सांगितल्याचं, या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे. परंतु सरकारने याबाबत माहिती दिली असून हा मेसेज फेक असल्याचं सांगितलं आहे. याबाबत PIB Fact Check ने ट्विटरवर पोस्ट केलं आहे. 'कार्ड एटीएममध्ये टाकण्याआधी दोन वेळा कॅन्सल बटण प्रेस करावं. यामुळे तुमचा पिन चोरी होणार नाही, RBI कडून या सूचना देण्यात आल्या आहेत', असा दावा व्हायरल फेक मेसेजमध्ये करण्यात आला आहे. परंतु RBI कडून अशी कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याचं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं आहे.

  (वाचा - स्कॅम अ‍ॅड्सद्वारे युजर्सची फसवणूक, News Feed वर बनावट जाहिराती कशा ओळखाल?)

  या मेसेजमध्ये असंही सांगण्यात आलं आहे, की जर पिन नंबर चोरी करण्यासाठी कोणी कीपॅड सेटअप ठेवत असेल, तर कॅन्सल बटण दोन वेळा दाबल्यामुळे तो सेटअप कॅन्सल होईल. परंतु PIB Fact Check ने हे स्टेटमेंट फेक असून RBI ने हे जारी केलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, स्वत:च्या बँकिंग सुरक्षिततेसाठी युजर्सनी आपले बँक डिटेल्स किंवा ATM पिन कोणासोबतही शेअर करू नये. जर कोणी KYC च्या नावे डिटेल्स मागत असेल, तर ते देऊ नये. कोणत्याही अनोळखी लिंकवरही क्लिक करू नये.

  (वाचा - HDFC बँकेचं मोबाईल अ‍ॅप ठप्प! तुम्हीही ग्राहक असाल तर काय कराल, वाचा इथे)

  तुम्हीही करू शकता फॅक्टचेक - जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना किंवा धोरणांबाबतच्या सत्यतेबद्दल संशय असल्यास, तुम्ही पीआयबी फॅक्ट चेककडे ते पाठवू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच मेलद्वारेही पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हाट्सअपवर 8799711259 या क्रमांकावर संपर्क करता येईल. त्याशिवाय ट्विटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि pibfactcheck@gmail.com ईमेलद्वारे संपर्क करू शकता.
  Published by:Karishma Bhurke
  First published: