• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • iPhone खरेदी करायचा आहे? हा पॉप्युलर फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पाहा ऑफर

iPhone खरेदी करायचा आहे? हा पॉप्युलर फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पाहा ऑफर

ऑनलाईन आधीपासूनच हा फोन सवलतींच्या दरात उपलब्ध आहे. दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने सध्या आयफोन 12 वर 9 हजार रुपयांची सूट जाहिर केली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 25 जून : सध्या अ‍ॅपलचे (Apple) विविध स्मार्टफोन (Smartphones) बाजारात उपलब्ध आहेत. वैशिष्टपूर्ण फीचर्स, आकर्षक मॉडेल्समुळे आयफोनचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. नव्याने आयफोन घेणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील काही कमी नाही. सध्या आयफोन खरेदी करू शकणाऱ्या ग्राहकांसाठी विविध ऑफर्स आहेत. त्यात iPhone 12 वर अमेझॉनवर (Amazon) एक जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे. जर नवा आयफोन 12 (iPhone 12) घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला हा फोन सध्या स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. आयफोनची पुढील सिरीज लॉन्च होण्यापूर्वी आयफोन 12 च्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन आधीपासूनच हा फोन सवलतींच्या दरात उपलब्ध आहे. दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने सध्या आयफोन 12 वर 9 हजार रुपयांची सूट जाहिर केली आहे. iPhone 12 चं बेस मॉडेल अ‍ॅमेझॉनवरील नव्या डिलनुसार 79,000 रुपयांऐवजी 70,900 रुपयांना उपलब्ध होत आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून, केवळ आयफोन 12 च्या 64 जीबी या वेरिएंटसाठीच ती लागू असेल. भारतात आयफोन 12 लॉन्च करण्यात आला त्यावेळी त्याची किंमत 79,900 रुपये होती.

(वाचा - कोरोनामुळे बदलला भारतीयांचा खरेदी ट्रेंड; चारमधील एका फोनची ऑनलाईन खरेदी)

अ‍ॅमेझॉन पेवर ICICI बॅंकेच्या क्रेडिट कार्डवर 400 रुपयांपर्यंत मिळणार कॅशबॅक - या डिस्काउंट किमती व्यतिरिक्त आयफोन 12 खरेदी केल्यावर अ‍ॅमेझॉन पेवर आयसीआयसीआय क्रेडिट कार्डच्या (ICICI Credit Card) माध्यमातून पेमेंट केल्यास 400 रुपयांचा कॅशबॅकसुध्दा (Cashback) मिळणार आहे. जे लोक आपला जुना फोन एक्चेंज करुन आयफोन 12 खरेदी करु इच्छितात त्यांना 11,500 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल. हे डिल अधिक आकर्षक व्हावं, यासाठी कंपनीने नो-कॉस्ट ईएमआयचा (N0-Cost EMI) पर्यायदेखील उपलब्ध करुन दिला आहे. 64 जीबी वेरिएंट व्यतिरिक्त आयफोन 12, 128 जीबी या वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ज्या कलरचं हे मॉडेल तुम्ही निवडाल त्यावर तुम्ही 5000 रुपयांपर्यंत बचत करु शकता. सध्या 256 जीबी या वेरिएंटवर कोणतीही सूट मिळणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

(वाचा - Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस)

iPhone 12 Mini वर 6 हजार रुपयांची सूट - या प्रकारची सूट आयफोन 12 च्या अन्य मॉडेल्सवर देखील मिळणार आहे. ज्यात आयफोन 12 मिनीचा (iPhone 12 Mini) समावेश आहे. तुम्ही आयफोन 12 मिनी खरेदी केल्यास तुम्हाला 6 हजार रुपयांची सूट मिळू शकते. म्हणजेच हा फोन तुम्हाला 63,900 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
First published: