Home /News /technology /

Alexa नावामुळे शाळेत मुलींची उडवली खिल्ली; आई-वडिलांनी Amazon कडे केली मोठी मागणी

Alexa नावामुळे शाळेत मुलींची उडवली खिल्ली; आई-वडिलांनी Amazon कडे केली मोठी मागणी

ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलींचं नाव अ‍ॅलेक्सा ठेवलं आहे, त्यांना आता या नावामुळे मोठी समस्या झाली आहे. अ‍ॅलेक्सा नावानेच अ‍ॅमेझॉनचं व्हर्चुअल असिस्टेंट आल्यानंतर अनेक जण त्या मुलींची सारखंच नाव असल्याने खिल्ली उडवत आहेत.

  नवी दिल्ली, 5 जुलै: आपल्या मुलांचं नामकरणं करणं, ही प्रत्येक आई-वडिलांसाठी आनंदाची गोष्ट असते. परंतु काही आई-वडिलांना आपल्या मुलींचं नामकरण केल्यानंतर इतकी मोठी समस्या निर्माण होईल असं कधी वाटलंही नसेल. ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलींचं नाव अ‍ॅलेक्सा ठेवलं आहे, त्यांना आता या नावामुळे मोठी समस्या झाली आहे. अ‍ॅलेक्सा नावानेच अ‍ॅमेझॉनचं व्हर्चुअल असिस्टेंट (Amazon Alexa virtual assistant) आल्यानंतर अनेक जण त्या मुलींची सारखंच नाव असल्याने खिल्ली उडवत आहेत. आता या मुलींच्या आई-वडिलांनी अ‍ॅमेझॉनकडे त्यांच्या व्हर्चुअल असिस्टेंटचं नाव बदलण्याची विनंती केली आहे. 2014 मध्ये आलेल्या अ‍ॅमेझॉनच्या व्हर्चुअल असिस्टेंटमुळे अ‍ॅलेक्सा नावाच्या मुलींना अनेक समस्या होत आहेत. अनेक लोक या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. तर दुसरीकडे या मुलींना मात्र त्रास सहन करावा लागतोय. ज्या मुलींचं नावं अ‍ॅलेक्सा ठेवण्यात आलं आहे, त्यांच्या आई-वडिलांनी, लोक त्यांच्या मुलींना चिडवत असल्याचं म्हटलंय. तसंच त्यांच्या नावाची खिल्लीही उडवली जात आहे. त्यानंतर आता अ‍ॅलेक्सा नावाच्या मुलींच्या आई-वडिलांनी अ‍ॅमेझॉनकडे आपल्या व्हर्चुअल असिस्टेंटचं नाव बदलण्याची विनंती केली आहे.

  (वाचा - मोदींनी ड्रोनद्वारे केली 6 शहरातल्या अत्याधुनिक Housing Project ची पाहणी)

  अ‍ॅलेक्सा नावाच्या मुलींना त्यांच्या शाळेत नावावरुन चिडवलं जातं. यामुळे या मुलींच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला असून, त्यांचा आत्मविश्वासही कमी झाल्याचं पालकांनी म्हटलं आहे. एका आईने यामुळेच आपल्या मुलीचं नाव बदललं. शाळेत याप्रकरणी आई-वडिलांची कोणीही मदत करत नाही. अ‍ॅलेक्सा असं शाळेत जोरात ओरडून, पुढे काहीही आदेश देत त्यांची खिल्ली उडवली जाते.

  (वाचा - जगातील या महागड्या स्मार्टफोन्सबद्दल वाचून बसेल धक्का; लाखो रुपये किंमत)

  एका आईने याबाबत होणारा त्रास व्यक्त करत सांगितलं, की माझी मुलगी आपली खिल्ली उडवली जाईल या भीतीने स्वत:चा परिचय देत नाही. ती मोठी असती तर गोष्ट वेगळी असती. परंतु ती लहान मुलगी आहे. अशाप्रकारे चिडवणं चुकीचं आहे. अ‍ॅमेझॉनची प्रतिक्रिया - अ‍ॅमेझॉनने आपल्या व्हॉईस असिस्टेंटचं नाव बदलण्याचा विचार करावा, असं आई-वडिलांचं म्हणणं आहे. या वादावर उत्तर देत अ‍ॅमेझॉनने सांगितलं, की अशा प्रकारच्या अनुभवांनी ते दु:खी आहेत. अ‍ॅमेझॉनचं हे व्हॉईस असिस्टेंट केवळ युजर्ससाठी डिझाईन केलं गेलं आहे. कोणत्याही प्रकारे चिडवणं, खिल्ली उडवणं अस्वीकार्य असून याचा त्यांनी निषेध केला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Amazon, Google, Tech news

  पुढील बातम्या