मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

उन्हाळ्यात जुना Cooler थंड हवा देत नाही, लगेच करा ही 3 कामं

उन्हाळ्यात जुना Cooler थंड हवा देत नाही, लगेच करा ही 3 कामं

तुमचा कूलर जुना असेल तर तो थंड हवा देत नसण्याची शक्यता आहे. तर, काही उपाय आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही त्याच जुन्या कूलरच्या मदतीने तुमचं घर थंड करू शकता.

तुमचा कूलर जुना असेल तर तो थंड हवा देत नसण्याची शक्यता आहे. तर, काही उपाय आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही त्याच जुन्या कूलरच्या मदतीने तुमचं घर थंड करू शकता.

तुमचा कूलर जुना असेल तर तो थंड हवा देत नसण्याची शक्यता आहे. तर, काही उपाय आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही त्याच जुन्या कूलरच्या मदतीने तुमचं घर थंड करू शकता.

नवी दिल्ली, 13 मे : देशभरात उन्हाळ्यामुळे (Summer) भयंकर उष्णता वाढली आहे. उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या रखरखत्या उन्हात घर थंड ठेवण्याचं आव्हान सगळ्यांच्या समोर आहे. घर थंड ठेवण्यासाठी कित्येकजण कूलर (Cooler) आणि एसीचा (AC) वापर करतात. पंखा तर या उन्हात उपयोगी नाही, इतक्या जास्त प्रमाणात उष्णता आहे. तर एसी प्रत्येकाला परवडत नाही. त्यामुळे कूलर वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, कूलरने तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळत नसेल तर काहीतरी गडबड नक्कीच आहे. तुमचा कूलर जुना असेल तर तो थंड हवा देत नसण्याची शक्यता आहे. तर, आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही त्याच जुन्या कूलरच्या मदतीने तुमचं घर थंड करू शकता. कूलर मोकळ्या आणि हवेशीर जागेत ठेवा - कूलर नवीन असो वा जुना, तो नेहमीच मोकळ्या जागेत ठेवा. बंदिस्त भागात किंवा भिंतीच्या जवळ ठेवू नका. कूलर जेवढ्या मोकळ्या जागेत ठेवाल तेवढीच थंड हवा कूलर देईल. त्यामुळे कूलर खिडकीवर (Window) लावा किंवा जाळीचा दरवाजा असेल तर तिथे ठेवा. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. व्हेंटिलेशन असणं गरजेचं - तुम्ही व्हेंटिलेशन नसलेल्या जागी कूलर ठेवला असेल तर कूलर थंड हवा देणार नाही. त्यामुळे थंड हवेसाठी हवा खेळती राहील, अशा ठिकाणी कूलर लावणं गरजेचं आहे. व्हेंटिलेशन नसेल तर कूलर थंड हवेऐवजी आर्द्रता निर्माण करेल. खोलीतून हवा बाहेर पडल्यावरच कूलर थंड होईल, त्यामुळे कूलर ठेवलाय, तिथे योग्य व्हेंटिलेशन असल्याची काळजी घ्या.

हे वाचा - Guarantee-Warranty काळात कंपनीने प्रोडक्ट दुरुस्त करण्यास नकार दिल्यास काय कराल? या दोन्हीत काय आहे फरक

थेट उन्हात कूलर ठेवू नका - बरेच लोक थेट उन्हात कूलर ठेवण्याची चूक करतात. जिथे जास्त सूर्यप्रकाश असतो, जास्त ऊन पडतं, तिथं लोक कूलर लावतात, त्यामुळे थंड हवा मिळत नाही. म्हणून जिथे थेट सूर्यप्रकाश येत नसेल तिथे कूलर ठेवा, जेणेकरून तुम्हाला थंड हवा मिळेल. किंवा कूलर ठेवताय तिथे थोडी सावली करा, जेणेकरून थेट ऊन कूलरवर पडणार नाही. या काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा कूलर थंड हवा देईल, जेणेकरून खोली थंड राहील आणि तुमची उकाड्यापासून सुटका होईल. शक्यतो कूलर घराच्या खिडकीत ठेवा, बाहेरची जेवढी खेळती हवा कूलर शोषून घेईल, तेवढीच थंड हवा तुम्हाला खोलीच्या आत मिळेल आणि तुमचा उन्हाळा सुखकर जाईल.
First published:

Tags: Summer, Tech news

पुढील बातम्या