नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणार Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर

नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणार Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर

भारत आणि काही युरोपीय देशांच्या बाजारपेठेत एकाच वेळी म्हणजे जानेवारी 2021 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर दाखल करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. भारतातील पेट्रोलवरील स्कूटरच्या स्पर्धात्मक किंमतीत ही स्कूटर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20  नोव्हेंबर : ऑनलाइन कॅब बुकिंग सेवा देणारी कंपनी ओला कॅब्स आता इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादन उद्योगात उतरली असून, पहिली ई-स्कूटर जानेवारी 2021 मध्ये भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला नेदरलँड्समधील एका प्रकल्पात या स्कूटरची निर्मिती केली जाईल आणि युरोपसह भारताच्या बाजारपेठेत तिची विक्री करण्यात येईल. त्यानंतर आत्मनिर्भर भारत अभियानात सहभागी होण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी देशातच उत्पादन प्रकल्प उभारण्याचा विचार करत आहे.

इटेर्गो बीव्हीचे अधिग्रहण -

या वर्षी मे महिन्यात ओला इलेक्ट्रिकने अॅमस्टरडॅम स्थित इटेर्गो बीव्ही या कंपनीचं अधिग्रहण केलं होतं. 2014 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने ‘अॅप स्कूटर’विकसित केली होती. उच्च क्षमतेच्या बॅटरीचा वापर करून 240 किलोमीटर अंतर चालण्याची क्षमता या स्कूटरमध्ये निर्माण करण्यात आली होती. त्याचवेळी कंपनीने 2021 पर्यंत भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक दुचाकी वाहन दाखल करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं.

(वाचा - Maruti Suzuki 7 सीटर Ertiga कारला मोठी पसंती, लाखो गाड्यांच्या विक्रीची नोंद)

भारत आणि युरोपीय बाजारपेठेत एकाचवेळी दाखल करणार ई-स्कूटर -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि काही युरोपीय देशांच्या बाजारपेठेत एकाच वेळी म्हणजे जानेवारी 2021 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर दाखल करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. भारतातील पेट्रोलवरील स्कूटरच्या स्पर्धात्मक किंमतीत ही स्कूटर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. देशातील दोन कोटी दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेतील मोठा हिस्सा काबीज करण्याचं कंपनीचं ध्येय आहे. पहिल्या वर्षी 20 लाख ई -स्कूटर्स विकण्याच कंपनीचं लक्ष्य आहे.

(वाचा - 'या' इलेक्ट्रिक स्कूटर देतील सिंगल चार्जमध्ये जबरदस्त मायलेज; जाणून घ्या किंमत)

भारतातील सर्वांत मोठा ई -स्कूटर उत्पादन प्रकल्प उभारणार -

ओला कॅब्स ई-स्कूटर निर्मितीसाठी उत्पादन प्रकल्प उभारण्याबाबत वेगवेगळ्या राज्यांशी चर्चा करत आहे. हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वांत मोठा ई-स्कूटर प्रकल्प असेल. तब्बल 100 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्याची वार्षिक उत्पादन क्षमता 20 लाख युनिट्स इतकी असेल.

(वाचा - एकदा चार्ज केल्यावर 200 किलोमीटर चालते ही स्कूटर; जाणून घ्या किंमत)

कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्य सरकारांशी ओला या उत्पादन प्रकल्पासाठी चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या देशात बजाज ऑटो, हिरो मोटो कॉर्प, हिरो इलेक्ट्रिक आणि अन्य कंपन्याही ई-स्कूटर निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत.

Published by: Karishma Bhurke
First published: November 20, 2020, 4:48 PM IST

ताज्या बातम्या