Home /News /technology /

Ola युजर्ससाठी भन्नाट फीचर, आता मोबाइलने लॉक करता येणार Electric Scooter

Ola युजर्ससाठी भन्नाट फीचर, आता मोबाइलने लॉक करता येणार Electric Scooter

इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये (Electric Scooter) आणखी एक मिसिंग फीचर जोडणार असल्याचं सांगितलं आहे.

  नवी दिल्ली, 23 एप्रिल : Ola Electric लवकरच आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro मध्ये आपला पहिला OTA अर्थात ओवर-द-एयर अपडेट रोल आउट करणार आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आणखी एक मिसिंग फीचर जोडणार असल्याचं सांगितलं आहे. ओला इलेक्ट्रिकचे फाउंडर आणि CEO भाविश अग्रवाल यांनी Ola App चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. Ola App लॉक फीचर लवकरच सक्रीय होईल (Ola Electric Scooter App Lock) अशी माहिती देण्यात आली आहे. अग्रवाल यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत लिहिलंय, आमचं ओला इलेक्ट्रिक App MoveOS 2 तयार आहे. तसंच ओला इलेक्ट्रिकचे चीफ मार्केटिंग ऑफिसर वरुण दुबे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर नसल्यास, स्कूटर लॉक करण्यासाठी App Lock सुविधा कशी सक्रिय करता येईल हे दाखण्यात आलं आहे. या App Lock आधी ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर S1 S1 Pro मध्ये सॉफ्टवेयर अपडेट मिसिंग असल्याचा खुलासा केला होता. मागील वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झाल्यानंतर S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरसाठी हे पहिलं ओवर-द-एयर (OTA) अपडेट आहे. जोडण्यात येणाऱ्या काही फीचर्समध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टिविटी, नेव्हिगेशन आणि क्रूज कंट्रोल फीचर्स सामिल आहेत.

  हे वाचा - Electric Scooters मध्ये आगीच्या घटनांबाबत नितीन गडकरींची कठोर भूमिका, कंपन्यांना इशारा

  ओला इलेक्ट्रिकने नव्या अपडेटमध्ये अॅक्टिव्ह होणाऱ्या सर्व फीचर्सची लिस्ट शेअर केलेली नाही. ओला इलेक्ट्रिक ग्राहकांना हिल होल्ड कंट्रोल आणि हायपर मोडसारखे काही मिळण्यासाठी वाट पाहावी लागू शकते. Ola Electric ने लाँचच्या वेळी स्कूटरचे हे प्रमुख फीचर्स म्हणून हायलाइट केले होते, जे सध्या कोणत्याही प्रतिस्पर्धींमध्ये उपलब्ध नाहीत. वरुण दुबे यांनी नुकतंच यातील बहुतेक अपडेट्स यावर्षी जूनआधी उपलब्ध होतील असं म्हटलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Electric vehicles

  पुढील बातम्या